शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कृषी खात्यात १६२ नियमबाह्य बदल्या

By admin | Updated: June 25, 2016 03:43 IST

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडे कृषी खात्याचे मंत्रिपद असतानाच्या १९ महिन्यांत झालेल्या १६२ अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्यांची जंत्रीच समोर आली आहे

यदु जोशी,  मुंबईभाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडे कृषी खात्याचे मंत्रिपद असतानाच्या १९ महिन्यांत झालेल्या १६२ अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्यांची जंत्रीच समोर आली आहे. या बदल्यांमध्ये ‘अर्थपूर्ण’ व्यवहार झाल्याची ५०० पानी तक्रार थेट राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे करण्यात आली आहे.सार्वत्रिक बदल्यांचा कालावधी नसताना देखील लोकप्रतिनिधींच्या शिफारशींचा आधार घेत या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबत राज्यपालांकडे केलेल्या तक्रारीमध्ये खडसे व मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखविण्यात आले आहे. अ‍ॅड. प्रशांत कायंदे यांनी माहिती अधिकारात ही माहिती मिळवली आहे. नागरी सेवा मंडळास प्रस्तावित करण्यात आलेल्या बदल्या आणि या मंडळाने मान्य केलेल्या बदल्यांच्या संख्येतही मोठी तफावत आढळते. खडसे यांच्या स्तरावर काही बदल्या घुसवण्यात आल्या. अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या २६ बदल्या मंडळास प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. मंडळाने त्यातील १३ मान्य केल्या असताना आणखी १३ बदल्या या मंत्री स्तरावर समाविष्ट करण्यात आल्या. कृषी उपसंचालकांच्या २७ बदल्या प्रस्तावित होत्या. त्यापैकी नागरी सेवा मंडळाने एक मान्य केली असताना १० जणांच्या बदल्या करण्यात आल्या. महाराष्ट्र कृषी सेवा अधिकारी वर्ग ब च्या ६६ बदल्या मंडळास प्रस्तावित केल्या होत्या. मंडळाने १७ मान्य केल्या, मंत्री स्तरावर १५ अधिकाऱ्यांचा समावेश झाला. मात्र उर्वरित ४० अधिकाऱ्यांच्या प्रस्तावाला नागरी सेवा मंडळाची मान्यताच घेतली नाही. राज्यपाल काय निर्णय घेतात, याकडे कृषी खात्याचे लक्ष लागून आहे. सार्वत्रिक बदल्या करताना नियमानुसार चारच अधीक्षक कृषी अधिकारी बदलीपात्र होते. त्यापैकी तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र त्याचवेळी अपात्र २५ अधिकाऱ्यांच्याही बदल्या उरकण्यात आल्या. २९ कृषी उपसंचालक पात्र होते. त्यातील २३ जणांच्या बदल्या करण्यात आल्या, तर पात्र नसलेल्या १४ जणांच्या बदल्या करण्यात आल्या. ७५ महाराष्ट्र कृषी सेवा अधिकारी (ब) नियमानुसार बदलीस पात्र होते. त्यातील ६० जणांच्या बदल्या करण्यात आल्या. अपात्र तब्बल ७७ जणांच्या बदल्या करण्यात आल्या. १९१ कृषी अधिकारी बदलीस पात्र होते. त्यातील १६२ जणांच्या बदल्या झाल्या. बदलीस पात्र नसलेल्या ४६ जणांच्या बदल्या करण्यात आल्या. नियमबाह्यरीत्या केलेल्याबदल्यांचा तपशील संवर्गनियमबाह्यबदल्याअधीक्षक कृषी अधिकारी८कृषी उपसंचालक८म.कृ.से. ब वर्ग अधिकारी९कृषी अधिकारी१