शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

१६ वर्षांची परंपरा - भाविकांसाठी मोफत फराळ व पाण्याची सोय

By admin | Updated: July 14, 2016 18:38 IST

शहरातील श्री सत्संग प्रतिष्ठानद्वारा पंढरपूर जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत दर्शनाची सोय करण्यात आली आहे़ गेल्या पंधरा वर्षापासून भाविकांना भावलेली मोफत दर्शनाची परंपरा आजही

ऑनलाइन लोकमतलातूर, दि. १४ -  शहरातील श्री सत्संग प्रतिष्ठानद्वारा पंढरपूर जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत दर्शनाची सोय करण्यात आली आहे़ गेल्या पंधरा वर्षापासून भाविकांना भावलेली मोफत दर्शनाची परंपरा आजही कायम ठेवण्यात आली असून, गुरूवारी सकाळी ११ वाजता लातूर मध्यवर्ती बसस्थानकातून विठ्ठल दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना महापौर दीपक सूळ यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. गेल्या पंधरा वर्षापासून श्री सात्संग प्रतिष्ठान लातूरच्या वतीने अध्यक्ष गोविंदलाल पारीख, सचिव चंदू लड्डा, कार्याध्यक्ष रमेशचंद्र भुतडा, उपाध्यक्ष दत्ता लोखंडे, कोषाध्यक्ष रामेश्वर भराडीया यांनी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे़ या प्रतिष्ठानच्या वतीने पंढरपूरला जाणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी ११ बसेसचे नियोजन मोफत करण्यात आले आहे़. तसेच भाविकांच्या फराळाची सोय व्हावी यासाठी सोबत भोजनाचे पॉकेट व केळींची सोय करण्यात आली आहे़ या प्रतिष्ठानच्या वतीने निस्वार्थ भावानेने भाविकांसाठी सुरू केलेल्या मोफत विठ्ठल दर्शनाचा वसा आजपर्यंत कायम जोपासला असल्याने शेकडो भाविकांनी गुरूवारी मध्यवर्ती बसस्थानकातील पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनसाठी मध्यवर्ती बसस्थानकातून रवाना झाले आहेत़ या भाविकांना निरोप देण्यासाठी महापौर दीपक सूळ, उपमहापौर चाँदपाशा घावटी, मनपा विरोधी पक्षनेते मकरंद सावे, विक्रम गोजमगुंडे, रेणुकाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवराज मोटेगावकर, उद्योगपती बालकिशन मुंदडा, द्वारकादास शामकुमारचे तुकाराम पाटील, दिलीप माने, स्थानक प्रमुख बलभीम पाटील, व्यंकट बिराजदार,नवलकिशोर सारडा, बालाजी बारबोले यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती़.

अखंडपणे सेवेची परंपरा...श्री सत्संग प्रतिष्ठान लातूरच्या वतीने दरवर्षीपणे याहीवर्षी पंढरपूरला विठ्ठल-रूक्मिणी दर्शनासाठी मोफत बसची सेवा सुरू करण्यात आली़ ही सेवा गेल्या पंधरा वर्षापासून सुरू असून, हे १६ वे वर्ष आहे़ दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत असल्यामुळे या वर्षी ११ बसेसची सोय करण्यात आली आहे़ ही सेवा अखंडपणे चालू ठेवणार असल्याचा विश्वास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद पारीख यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.