शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात १६ पर्यटकांना जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 01:15 IST

विदर्भात दोन महिन्यांत १६ पर्यटकांना जलसमाधी मिळाली. नागपूर जिल्ह्यात मौजमस्तीसाठी गेलेल्या १० तरुणांना जुलै महिन्यात जलसमाधी मिळाली. त्यात वेणा जलाशय परिसरातील एकाच घटनेत आठ तरुणांचा मृत्यू झाला,

- गणेश खवसे

नागपूर : विदर्भात दोन महिन्यांत १६ पर्यटकांना जलसमाधी मिळाली. नागपूर जिल्ह्यात मौजमस्तीसाठी गेलेल्या १० तरुणांना जुलै महिन्यात जलसमाधी मिळाली. त्यात वेणा जलाशय परिसरातील एकाच घटनेत आठ तरुणांचा मृत्यू झाला, तर नागपंचमीच्या दिवशी परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या सहापैकी दोघांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू झाला.गोंदिया : शिरपूरबांध धरणावर आंघोळीसाठी गेलेल्या दोघा तरुणांचा बुडून मृत्यू झाला. गोंदिया जिल्ह्यात हाजराफॉल, गोठणगाव, शिरपूरबांध, कालीसरार गावे पर्यटनस्थळे म्हणून ओळखली जातात. येथे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.चंद्रपूर : तलावात, नदीत बुडून मरण पावल्याच्या तीन दुर्घटना घडल्या. त्यात दोन विद्यार्थी व दोन बालकांचा बुडून मृत्यू झाला.भंडारा : वैनगंगा नदी, कोरंभीदेवी, रावणवाडी, चांदपूर जलाशय आणि गोसेखुर्द धरण पर्यटनासाठी असले तरी येथे ‘नो टुरिस्ट झोन’ म्हणून फलक लावलेले आहेत.यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा सुरक्षेच्या उपाययोजनांअभावी धोकादायक बनला आहे. उंचावरून कोसळणारा धबधबा अनुभवण्यासाठी काही वेळा पर्यटक लोखंडी बॅरिकेटस् ओलांडतात. त्यातून अपघात झाले आहेत.अमरावती : चिखलदरा पर्यटन स्थळावरील पंचबोल पॉइंटच्या दरीत ३१ जुलैला अकोल्यातील विनोद तितरे हा युवक पाय घसरून पडला होता. सुदैवाने झाडात अडकल्याने त्याचे प्राण बचावले.सेल्फीच्या नादात ८ तरुण जिवांचा अंतनागपूरपासून अवघ्या ३० किमी अंतरावरील वेणा जलाशयात ९ जुलैला घडलेली घटना थरकाप उडविणारी होती. सहलीसाठी गेलेले १० तरुण वेणा जलाशयात बोटीने फिरत असताना सेल्फीच्या नादात बोट उलटली. त्यात आठ तरुणांचा करुण अंत झाला.कुठे, किती पाऊस बरसला? कोणत्या धरणातून किती पाणी सोडण्यात येत आहे? याची माहिती दिली जाते. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिकाºयांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनविण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज आहे.- अभिषेक नामदास, आपत्ती व्यवस्थापनप्रमुख, भंडारा