शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

बाईक अपघातात १६ महिन्यांत ३४८ जणांचा मृत्यू

By admin | Updated: May 22, 2016 16:41 IST

गेल्या १६ महिन्यांच्या कालावधीत नागपूर शहरात सोळाशेहून अधिक अपघात झाले

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 22- नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. परंतु त्याचे पालन न झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो. गेल्या १६ महिन्यांच्या कालावधीत नागपूर शहरात सोळाशेहून अधिक अपघात झाले आणि यात ३४८ नागरिकांना जीव गेलाय तर गेल्या १६ महिन्यांत वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत ७९ हजारहून अधिक नागरिकांना दंड करण्यात आला. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपुरातील वाहतुकीसंदर्भात माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. नागपुरात घडलेले गुन्हे, दंडातून प्राप्त झालेला महसूल, हेल्मेट कारवाई, अपघातांत झालेले मृत्यू इत्यादी प्रश्न उपस्थित करण्यात आले. प्राप्त झालेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०१५ ते ३० एप्रिल २०१६ या कालावधीत नागपुरात १ हजार ६७१ अपघात झाले. यात ३५८ नागरिकांचा मृत्यू झाला तर १ हजार ७२८ नागरिक जखमी झाले. डोक्याला मार लागून झालेल्या मृत्यूची माहितीच नाहीगेल्या काही महिन्यांपासून हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्यांविरोधात कारवाईचे प्रमाण वाढीस लागले आहे. हेल्मेट न घातलेल्या ७९ हजार ७७७ नागरिकांवर कारवाई करण्यात आली व यातून १३ लाख ७३ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कालावधीत झालेल्या अपघातांमध्ये नेमक्या किती नागरिकांचा डोक्याला मार लागून मृत्यू झाला याची मात्र वाहतूक विभागाकडे कुठलीही माहिती उपलब्ध नाही. हेल्मेटप्रकरणी २५२ पोलिसांवर कारवाई१ जानेवारी २०१५ ते ३० एप्रिल २०१६ या कालावधीत २५२ पोलिसांवर हेल्मेट न घातल्याबाबत कारवाई करण्यात आली. यासंदर्भात २५ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नागरिकांवर कारवाई करत असताना पोलीसांकडून नियमांचे पालन का होत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.