शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

१६ संचालक, अधिकाऱ्यांना तुरुंगवास

By admin | Updated: February 8, 2017 05:13 IST

राज्यभर गाजलेल्या बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी मंगळवारी येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी वी.म.सुंदाळे यांनी १६ जणांना दोषी

अंबाजोगाई : राज्यभर गाजलेल्या बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी मंगळवारी येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी वी.म.सुंदाळे यांनी १६ जणांना दोषी ठरवत प्रत्येकी पाच वर्षे तुरुंगवास व ६० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तर तिघे गुन्हा नोंद झाल्यापासून फरार असून उर्वरित १५ जणांना न्यायालयाने निर्दोष ठरविले. शिक्षा झालेल्यांमध्ये माजी अध्यक्ष राजाभाऊ मुंडे यांच्यासह आठ संचालक व बँक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बीड जिल्हा बँकेतर्फे २ कोटी ७५ लाख ५० हजार रुपयांचे बेकायदेशीर कर्जवाटप केल्याचे हे प्रकरण आहे. घाटनांदूर येथील शेतकरी सहकारी तेलबिया कृषी प्रक्रिया संस्थेस या बँकेने २०११ साली २ कोटी ७५ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज प्रकरण मंजूर केले होते. या कर्ज प्रकरणाचे विभागीय लेखा परीक्षक रवींद्र गोदाम यांनी लेखा परीक्षण केले. त्यात प्रक्रिया संस्थेने बोगस सभासद दाखवून कर्ज उचलून बँकेची फसवणूक केल्याचे समोर आले. गोदाम यांनी ३० जून २०११ रोजी ग्रामीण ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ३४ जणांवर फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार करून विश्वासघात केल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल झाला होता. प्राथमिक तपास अंबाजोगाई ग्रामीण ठाण्याचे सहायक निरीक्षक बी.आर. गित्ते यांनी केला. उच्च न्यायालयाने एसआयटीमार्फत तपासाचे आदेश दिल्यानंतर उपअधीक्षक स्वाती भोर यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या संस्थेस कर्ज देताना बँकेच्या अध्यक्षांनी उपकर्ज समितीतील ८ सदस्यांची बैठक ही बँकेच्या मुख्यालयातील मंथन या सभागृहात न घेता नायगाव येथील शासकीय विश्रामगृहात घेतली असल्याचे स्पष्ट झाले होते. ही बैठक केवळ कागदोपत्रीच असावी, असा जबाब कर्ज उपसमितीचे सदस्य विलास सोनवणे व विलास बडगे यांनी दिला होता. न्यायालयाने ५१ साक्षीदारांची तपासणी केली. सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील अशोक कुलकर्णी यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)पाच जणांनी उचलले २ कोटी ७५ लाख२ कोटी ७५ लाख रुपयांची रक्कम संस्थेच्या घाटनांदूर शाखेच्या नावावर मंजूर झाली. घाटनांदूर येथील शाखाधिकाऱ्यांनी ही रक्कम देण्यास नकार दर्शविल्याने परळीच्या शाखेतून ही रक्कम केदारेश्वर स्टील इंडस्ट्रीजचे जनार्दन डोळे (५५ लाख), रंगनाथ देसाई (४१ लाख ४० हजार), सुनील मसवले (४५ लाख), रमेश मुंडे (४५ लाख) यांनी ही सर्व रक्कम संस्थेच्या खात्यावरून स्वत:च्या ताब्यात घेतली व संस्थेच्या पैशाचा अपहार केला. म्हणून या पाच जणांचाही आरोपींमध्ये समावेश आहे. जामिनासाठी भरले १ कोटी २० लाख रुपयेबँक घोटाळा प्रकरणात एकूण ३४ जणांवर गुन्हे दाखल झाले होते. यातील ३१ आरोपींना अटक झाली होती. त्यांच्याकडून जामिनासाठी उच्च न्यायालयाने १ कोटी २० लाख रुपयांची रक्कम भरून घेतली होती. या रकमेचा भरणा झाल्यानंतरच या सर्व आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला होता. प्रभू गुट्टे, सतीश जायभाये व अशोक बहिरवाल हे तीन आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहेत. घोटाळा प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने अ‍ॅड. अशोक कुलकर्णी यांची विशेष अभियोक्ता म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी ५० साक्षीदार तपासून सबळ पुरावे न्यायालयासमोर सादर केले.