शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जीवनदायी आरोग्य योजनेत १५० नवीन शस्त्रक्रिया

By admin | Updated: July 6, 2015 02:37 IST

महाराष्ट्र राज्य सरकारने राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत १५० नवीन शस्त्रक्रियांचा समावेश करण्यात येणार आहे.

मुंबई : राज्यातील दारिद्र्यरेषेखालील (पिवळी शिधापत्रिकाधारक) आणि दारिद्र्यरेषेवरील (केशरी शिधापत्रिकाधारक) कुटुंबांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली आहे. या योजनेचा विस्तार करण्यात येणार असून येत्या चार महिन्यांत या योजनेत १५० नवीन शस्त्रक्रियांचा समावेश करण्यात येणार आहे. यासंदर्भात माहिती देताना योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीयूष सिंह यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, सध्या योजनेंतर्गत ९७१ शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. कर्करोग, हृदयरोग, किडनी प्रत्यारोपण इ. ३० विभागांच्या शस्त्रक्रिया या योजनेंतर्गत करण्यात येतात. येत्या काळात कॉक्लिअर इम्प्लांट (कानाच्या अंतर्भागातील नागमोडी नलिका), गुडघा प्रत्यारोपण, हीप रिप्लेसमेंट अशा शस्त्रक्रियांचा योजनेत समावेश करण्यात येणार आहे. या प्रक्रियेबाबत केईएम आणि जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांचाही सल्ला घेण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत दीड लाखापर्यंतच्या शस्त्रक्रियांचा खर्च शासनाकडून करण्यात येतो. किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी ही मर्यादा अडीच लाख रुपयांची आहे. भविष्यात या योजनेत यकृत प्रत्यारोपणाचा समावेश यात होऊ शकतो. शस्त्रक्रियांचा आकडा वाढल्यास प्रीमियमही वाढेल. या सर्व बाबींविषयी सध्या चर्चा सुरू असल्याचे सिंह यांनी सांगितले. (प्रतिनिधी)या योजनेच्या विस्तारीकरणाच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे.- डॉ.दीपक सावंत, सार्वजनिक आरोग्यमंत्री