शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सहा तासात १५ हजार युनिट विजेची बचत

By admin | Updated: August 11, 2014 00:54 IST

सध्या संपूर्ण महाराष्ट्र वीजसंकटाचा सामना करीत आहे. लोडशेडिंगच्या नावाखाली अनेक गाव अंधारात रात्र काढत आहे. मात्र त्याच वेळी नागपुरातील एका संस्थेने विशेष उपक्रमाच्या माध्यमातून सहा तासांत

वीजसंकटावर पर्याय : ‘ग्रीन व्हिजिल’चा उपक्रम नागपूर : सध्या संपूर्ण महाराष्ट्र वीजसंकटाचा सामना करीत आहे. लोडशेडिंगच्या नावाखाली अनेक गाव अंधारात रात्र काढत आहे. मात्र त्याच वेळी नागपुरातील एका संस्थेने विशेष उपक्रमाच्या माध्यमातून सहा तासांत १५ हजार ४११ युनिट विजेची बचत केली आहे. या उपक्रमाचे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात कौतुक केले जात आहे. ‘ग्रीन व्हिजिल’असे त्या संस्थेचे नाव आहे. ही संस्था गत अनेक वर्षांपासून पर्यावरण क्षेत्रात काम करीत आहे. कोळशाचा मर्यादित साठा, पाण्याची टंचाई व वाढते प्रदूषण या ज्वलंत समस्या लक्षात घेता, या संस्थेने नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने गत जानेवारी २०१४ पासून शहरात हा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी रात्री ८ ते ९ वाजता दरम्यान शहरातील एका भागातील पथदिवे बंद केले जातात. शिवाय संस्थेचे पदाधिकारी लोकांच्या घरोघरी फिरून वीज बचतीचे महत्त्व पटवून देतात. यातून तब्बल ३२ हजार नागरिक या उपक्रमात सहभागी झाले आहेत. ते नागरिक आता स्वत:च्या घरातील अनावश्यक लाईट काही वेळासाठी बंद ठेवून, वीज बचतीस हातभार लावत आहे. अशाप्रकारे १५ जानेवारी २०१४ रोजी नागपुरात पहिला प्रयोग राबविण्यात आला. यानंतर १४ फेब्रुवारी २०१४ रोजी दुसरा, १६ एप्रिल रोजी तिसरा, १५ मे रोजी चौथा, १३ जून रोजी पाचवा व १२ जुलै रोजी सहावा उपक्रम राबविण्यात आला. यातून आजपर्यंत एकूण १५ हजार ४११ युनिट विजेची बचत झाली आहे. विशेष म्हणजे, एक युनिट वीज उत्पादित करण्यासाठी साधारण ५०० ग्रॅम कोळसा व ७.५ लिटर पाणी लागते. म्हणजेच १५ हजार ४११ युनिट विजेच्या बचतीसह ७ हजार ७०६ किलो कोळसा व १ लाख १५ हजार ५८५ लिटर पाण्याची बचत झाली आहे. शिवाय १५ हजार युनिट वीज तयार करताना वातावरणात पसरणाऱ्या हजारो किलो कार्बनडाय आॅक्साईडपासूनही बचाव झाला आहे. (प्रतिनिधी)