शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

भोंदूबाबांची १५ हजार पोस्टर्स जप्त

By admin | Updated: April 10, 2015 04:48 IST

अनेक समस्या सोडविण्याचे आश्वासन देऊन भोंदूगिरी करणाऱ्या बाबांविरोधात पश्चिम रेल्वे पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली आहे

मुंबई : अनेक समस्या सोडविण्याचे आश्वासन देऊन भोंदूगिरी करणाऱ्या बाबांविरोधात पश्चिम रेल्वे पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी पश्चिम रेल्वे पोलिसांनी केलेल्या कारवाईत भोंदूबाबांची जाहिरात करणारी १५ हजारांहून अधिक पोस्टर्स जप्त करण्यात आली. यामध्ये तीन भोंदूबाबा फरार असून, त्यांच्या आठ साथीदारांना अटक करण्यात आल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.नोकरी, ताणतणावासह अनेक समस्या सोडविण्याचे आश्वासन देणारी पोस्टर्स लोकलच्या डब्यात चिकटविण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे लोकलचा डबा विद्रूप होतानाच या पोस्टर्समधील आश्वासनालाही अनेक जण बळी पडतात. त्यामुळे रेल्वे पोलिसांकडून (आरपीएफ) त्याविरोधात गेल्या काही महिन्यांपासून कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी अंधेरी यार्ड येथे उभ्या असलेल्या लोकलच्या डब्यात बाबांची पोस्टर्स चिकटवण्यासाठी रेहान खान, सोहेल मोहंमद, अमिष अहमद, जुबेर खान आले असता रेल्वे पोलिसांनी त्यांना तत्काळ पकडले आणि त्यांच्याकडून १,५00 पोस्टर्स जप्त केली. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार वांद्रे येथेही पोलिसांनी छापा टाकला असता अशाच कामांसाठी आलेल्या मोहंमद शाहरुख, दिलशाद खान, फिरोज खान, शाहरुख अली यांना अटक केली. त्यांच्याकडून नऊ बॅगा हस्तगत करण्यात आल्या असता प्रत्येक बॅगेत १,७00 ते १,८00 पोस्टर्स असल्याचे निदर्शनास आले. या सर्वांना अटक करून अंधेरी रेल्वे कोर्टात हजर केले असता प्रत्येकाला २,५00 रुपयांचा दंड आणि १६ दिवसांच्या जेलची शिक्षा सुनावण्यात आली. (प्रतिनिधी)