शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

साडेबारा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली

By admin | Updated: June 12, 2017 03:05 IST

‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या कामातून अडीच वर्षांत साडेबारा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असून, तब्बल ११ हजार गावे टँकरमुक्त किंवा दुष्काळमुक्त झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या कामातून अडीच वर्षांत साडेबारा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असून, तब्बल ११ हजार गावे टँकरमुक्त किंवा दुष्काळमुक्त झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमांतर्गत ते बोलत होते. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे निर्मित ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी रविवारी जनतेशी संवाद साधला. ‘पाणी’ विषयावरील या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी निवडक लोकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ‘जलयुक्त शिवार’ अभियानात लोकसहभागातून ५६० कोटींचा निधी उभा राहीला. तर सरकारने योजनेसाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्च केले. मोठ्या धरणांपेक्षा जलसंधारणाच्या छोट्या कामांना प्राधान्य दिल्याने ‘जलयुक्त शिवार’ यशस्वी ठरल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जलयुक्तच्या माध्यमातून जितकी सिंचन क्षमता निर्माण झाली तितकी सिंचन क्षमता निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रकल्पांना साधारण ३० हजार कोटींचा खर्च आला असता, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. पिण्याच्या पाण्यासाठीही ‘जलयुक्त शिवार’ उपयोगी ठरली असून, साधारण ११ हजार गावे टँकरमुक्त व दुष्काळमुक्त करण्यात यश मिळाले आहे. जलयुक्तची गावागावांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.तीन वर्षांत ड्रीपवरीलक्षेत्र दुप्पट करणारप्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने २६ हजार कोटींचा निधी दिला आहे. नाबार्डनेही सूक्ष्म सिंचनासाठी कमी व्याजदरावर कर्ज देण्याचे कबूल केले आहे. तीन वर्षांत ड्रीपवरील क्षेत्र दुप्पट करण्यासाठी योजना आखली आहे. याशिवाय पाच धरण क्षेत्रांतील संपूर्ण ऊस ड्रीपवर आणण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.गोसी खुर्द प्रकल्प डिसेंबर २०१९पर्यंत पूर्ण करणारविदर्भातील गोसी खुर्द प्रकल्प डिसेंबर २०१९पर्यंत पूर्ण केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. गैरव्यवहारात अडकलेली आधीची सगळी कामे निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. पुनर्वसन जवळपास पूर्णत्वाला नेले आहे. जुन्या पुनर्वसित गावांतील प्रश्न सोडवण्यात आले, असे ते म्हणाले.