शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

दीड लाख ग्राहकांना मिळणार 'नवप्रकाश'

By admin | Updated: November 16, 2016 16:42 IST

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी महावितरणने 'नवप्रकाश' योजना सुरू केली आहे.

आप्पासाहेब पाटील

सोलापूर,दि. १६ : कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी महावितरणने 'नवप्रकाश' योजना सुरू केली आहे. जिल्ह्यातील सुमारे दीड लाख वीजग्राहकांना या योजनेत थकबाकीमुक्तीसोबतच नवीन वीजजोडणी घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

३१ मार्च २०१६ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या उच्च व लघुदाब वीजग्राहकांसाठी महावितरणने १ नोव्हेंबरपासून 'नवप्रकाश' योजना सुरू केली आहे. सोलापूर जिल्ह्यात १ लाख ४७ हजार ५६८ वीजग्राहकांकडे ७२ कोटी १७ लाख ९५ हजार रुपयांची मूळ थकबाकी, ११ कोटी ३५ लाख ४१ हजार रुपयांचे व्याज तसेच विलंब शुल्कापोटी १ कोटी ४४ लाख ३६ हजार रुपयांची थकबाकी आहे.

'नवप्रकाश' योजनेत येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण मूळ थकबाकीच्या रकमेचा भरणा केल्यास त्यामध्ये ५ टक्के सूट दिली जाईल तसेच व्याज व विलंब आकाराची १०० टक्के रक्कम माफ करण्यात येणार आहे. १ नोव्हेंबर २०१६ ते ३१ जानेवारी २०१७ पर्यंत मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराची १०० टक्के रक्कम माफ करण्यात येईल. तसेच १ फेब्रुवारी २०१७ ते ३० एप्रिल २०१७ पर्यंत मूळ थकबाकीसोबत २५ टक्के व्याजाच्या रकमेचा भरणा करावा लागणार असून, उर्वरित ७५ टक्के व्याज व १०० टक्के विलंब आकाराची रक्कम माफ होणार आहे. महावितरणच्या www. mahadiscom.in  संकेतस्थळावर संबंधित ग्राहकांच्या थकित देयकाचा तपशील व 'नवप्रकाश' योजनेत किती रक्कम भरायची याबाबत माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. थकबाकीची रक्कम धनादेशाद्वारेही स्वीकारली जाणार आहे. थकबाकीमुक्त वीजग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार त्वरित नवीन वीजजोडणी देण्यात येईल. त्यासाठी सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्शन चार्जेस, रिकनेक्शन चार्जेसमधून सूट देण्यात येणार आहे. तथापि, सुरक्षा ठेवीची रक्कम वर्षभराच्या वीजवापरानुसार आर्थिक वर्षात आकारण्यात येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी वीजग्राहकांनी महावितरणच्या संबंधित शाखा वा उपविभाग कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.-----------------पश्चिम महाराष्ट्रात पावणेसहाशे कोटींची थकबाकीपश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ५ लाख ७० हजार ग्राहकांना या योजनेतून थकबाकीमुक्तीची संधी मिळणार आहे. त्यांच्याकडे ४७२ कोटी रुपयांची मूळ थकबाकी, ९८ कोटी ५८ लाख रुपयांचे व्याज तसेच विलंब शुल्कापोटी ४ कोटी ७३ लाख रुपयांची थकबाकी आहे. एकूण थकबाकी ५७५ कोटी ३१ लाख रुपये आहे. --------------------जुन्या नोटांनी व्हा थकबाकीमुक्तवीजबिल भरण्यासाठी महावितरण येत्या २४ नोव्हेंबरपर्यंत जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारणार आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या घरगुती व वैयक्तिक ग्राहकांना जुन्या नोटा भरून थकबाकीमुक्त होण्याची ही सुवर्णसंधी आहे. तसेच ३० नोव्हेंबरपर्यंत मूळ थकबाकीत ५ टक्के सूट मिळणार आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी अधिक वेळ न दवडता आपली बिले भरावीत, असे आवाहन महावितरणने केले आहे. बिल भरणा केंद्रांवर महावितरणचे कर्मचारी दिवसभर जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी ग्राहकांचे अर्ज भरून देण्यास सहकार्य करत आहेत.-----------------येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण मूळ थकबाकीच्या रकमेचा भरणा केल्यास त्यामध्ये ५ टक्के सूट देण्यात येणार आहे़ या योजनेचा लाभ थकबाकीदार ग्राहकांनी घेऊन महावितरणला सहकार्य करावे़ --धनंजय औंढेकरअधिक्षक अभियंता, सोलापूऱ