शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय देसाईसह १५ निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2017 04:06 IST

खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय जयराम देसाई (वय ४०, रा. हिंदूगड मु. पो. पौड, ता. मुळशी) यांच्यासह इतर १५ आरोपींची

पुणे : खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय जयराम देसाई (वय ४०, रा. हिंदूगड मु. पो. पौड, ता. मुळशी) यांच्यासह इतर १५ आरोपींची खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून जिल्हा न्यायाधीश एस. जी. गिमेकर यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.विनायक सुरेश चव्हाण (वय २४ रा. जनता वसाहत, जनवाडी), किरण कृष्णा बांद्रे (वय ३६), योगेश बाबासाहेब मानकर (वय २८), रवी मल्लेश जेल्ली (वय २६), दशरथ बाळू चव्हाण (वय २६), विजय आत्माराम तेरकर (वय ३४), मंगेश वसंत धुमाळ (वय ३०), सचिन शंकर बांदरे (वय ३३), दादासाहेब महादेव बारगजे (वय ३०), देवेंद्र दशरथ भंडारे (वय २८), राम विठ्ठल वाघमारे (वय २९), बाळा दत्तात्रय येळवंडे (वय ३३), शरद अंकुश नामदास (वय २८), संजय आत्माराम तेरकर (वय ३०, सर्व रा. जनवाडी जनता वसाहत) व धनंजय देसाई अशी निर्दोष मुक्त झालेल्यांची नावे आहेत.मिलिंद पवार व भालचंद्र पवार यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले, की देसाई यांनी कटकारस्थान केले व गुन्हा घडविला असा पोलिसांनी पूर्णपणे खोटा आरोप करून जाणीवपूर्वक या गुन्ह्यात गुंतविले. घटनेच्या वेळी देसाई घटनास्थळी नव्हते. तो ग्राह्य धरून सर्व आरोपींची मुक्तता करण्यात आली. दरम्यान हडपसर येथील मोहसीन शेख खूनप्रकरणी देसाई आरोपी असून, येरवडा कारागृहात आहे. या खून खटल्याची सुनावणी अद्याप येथील न्यायालयात सुरू आहे. (प्रतिनिधी)कार्यकर्त्यांना दिली हत्यारे-४जनवाडी येथील कार्यकर्त्यांनी १८आॅक्टोबर ११ रोजी जनता वसाहत जनवाडी येथे धनंजय देसाई यांची सभा आयोजित केली होती. सभेनंतर जनता वसाहत येथे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हिंदू राष्ट्र सेनेचा बोर्ड लावला होता. वसाहतीमधील बबलू व जावेद कार्यकर्त्यांना विरोध करत होते. ही बाब या कार्यकर्त्यांनी देसाई यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांना सांगितली. तेव्हा त्यांचा काटा काढा मी कोर्टकचेरीचे बघून घेतो, असे आदेश देसाई यांनी कार्यकर्त्यांना दिले व कार्यकर्त्यांना हत्यारे दिली होती, असा सरकार पक्षाचा आरोप होता.४दि २ जानेवारी २०१२ रोजी रात्री १०.३० वाजता आरोपी व इतर काही अनोळखी लोकांनी बबलू ऊर्फ ईर्शाद मोहंमद हकीम खान (वय ३२) व जावेद मोहंमद हकीम खान (वय ३३) यांच्यावर रॅम्बो चाकू व चॉपरने वार केले व त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींना चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली होती. कटकारस्थान केल्याचा आरोप असलेल्या देसाई यांना अटकपूर्व जामीन मिळाला होता.