शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

सहा अपघातांत १५ जखमी

By admin | Updated: November 2, 2016 05:24 IST

रायगड जिल्ह्यात ऐन दिवाळीत गेल्या दोन दिवसांत झालेल्या वाहन अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत.

अलिबाग : रायगड जिल्ह्यात ऐन दिवाळीत गेल्या दोन दिवसांत झालेल्या वाहन अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत.रविवारी माणगाव तालुक्यातील वडगाव कोंड येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मधू शिवाजी लाकेश्री, विनोद केशव गावडे व अन्य एक असे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी मध्यरात्री १२.१५ वाजता मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर ट्रक नडगावच्या हद्दीत नदीपात्रात उलटून अपघात झाला. यात ट्रकचालक जखमी झाला असून त्याला महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रविवारी तिसरा अपघात संध्याकाळी ७.३० वाजता एका दुचाकीला नेरळ-दहवली गावाजवळ हद्दीत अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झाला. अपघातात साहिल मुश्ताक नाचण आणि मुसिद्दक रियाज बोंबे (रा. चिकन पाडा) हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर कल्याण येथे औषधोपचार चालू आहेत. रविवारी चौथा अपघात दुपारी चार वाजेच्या सुमारास नेरळजवळच्याच मरिचुलवाडी फाटा येथे झाला. टेम्पो चालकाने पादचाऱ्यास धडक मारून हा अपघात केला. अपघातात मारु ती भाऊ मेंगाळ (रा. मरिचुलवाडी, ता.कर्जत) हे जखमी आहेत. रविवारी पाचवा अपघात दुपारी २.३० वाजता मुंबई-गोवा हायवेवर लोहारे गावचे हद्दीत घडला. इनोव्हा कारचालकाने धडक दिल्याने पादचारी विश्वास रामचंद्र भोसले (रा.लोहारे पवारवाडी, ता.पोलादपूर) हे जखमी झाले असून त्यांच्यावर पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे औषधोपचार चालू आहेत.सोमवारी मुंबई-पुणे जुन्या हायवेवर सकाळी ११.४५ वाजता रिक्षाचे ब्रेक नादुरुस्त होऊन झालेल्या अपघातात शकील शेख, फातिमा अख्तर नाखुदा, रितू महबूब शेख, उमीर समीर शेख, मोहीन अख्तर नाखुदा, महेक अख्तर नाखुदा, समीर जागीर शेख हे जखमी झाले असून त्यांच्यावर खोपोली नगरपालिका रुग्णालय व एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे औषधोपचार चालू आहेत. या अपघात प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (विशेष प्रतिनिधी)>उरणहून पनवेलकडे निघालेल्या इर्टिगा कारला चिंचपाडा गावाजवळ कंटेनरने दिलेल्या धडकेत भीषण अपघात झाला. भाऊबीजेसाठी निघालेल्या या कुटुुंबातील सात वर्षाचा मुलगा जागीच ठार झाला तर अन्य सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर पनवेलमधील गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.