शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

खासदार उदयनराजेंसह १५ जणांवर खंडणीचा गुन्हा; सोना कंपनीच्या मालकाला बेदम मारहाण

By admin | Updated: March 24, 2017 01:39 IST

लोणंद येथील सोना या लोखंडी ठोकळे बनविणाऱ्या कंपनीच्या मालकाने दोन लाखांची खंडणीसाठी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार

सातारा : लोणंद येथील सोना या लोखंडी ठोकळे बनविणाऱ्या कंपनीच्या मालकाने दोन लाखांची खंडणीसाठी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दिल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह १५ जणांवर खंडणी आणि हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नऊ युवकांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना दि. २७ पर्यंत पोलिस कोठडी सुनावणी आहे.अशोक कांतिलाल सावंत (वय ४६,रा. यशवंतनगर, अकलूज माळशिरस, सध्या रा. हडपसर पुणे), रणजित अमृत माने, राजकुमार कृष्णात गायकवाड, ज्ञानेश्वर दिलीप कांबळे, महेश आप्पा वाघुले, अविनाश दत्तात्रय सोनवले (सर्व रा. फलटण तालुका) आणि सुकुमार सावता रासकर व धनाजी नामदेव धायगुडे या खंडाळा तालुक्यातील युवकांचा त्यामध्ये समावेश आहे.कंपनीचे मालक राजीवकुमार बालकिसन जैन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कंपनीतील कामगार व्यवस्थित काम करत नसल्याने कंपनी काही महिने बंद ठेवली होती. त्यामुळे ठेकेदारीवर घेतलेल्या कामगारांना काढून टाकण्यात आले. मात्र, रणजित माने यांनी फोन करून कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे लागेल तसेच कंपनी व्यवस्थित सुरू ठेवायची असेल तर दर महिन्याला दोन लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. भीतीपोटी मी १४ महिने २ लाख रुपये दिले. हे पैसे रणजित माने घेऊन जायचे; परंतु कंपनी तोट्यात आल्याने जानेवारी आणि फेब्रुवारीत पैसे देता आले नाहीत. पोलिसांनी सर्किट हाऊसमधील घटनेच्या पूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्ही फुटेज तपासासाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेच्या अनुषंगाने आणखीही पुरावे पोलिसांनी जप्त केले आहेत. (प्रतिनिधी)