शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेट्टींसह १४५ आंदोलकांना अटक

By admin | Updated: January 13, 2015 06:24 IST

ऊसाला किमान वाजवी किंमत (एफआरपी) न देणाऱ्या साखर कारखानदारांवर कारवाई करा, या मागणीसाठी आंदोलन करणा-या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साखर आयुक्तांच्या कार्यालयाची तोडफोड केली.

पुणे : ऊसाला किमान वाजवी किंमत (एफआरपी) न देणाऱ्या साखर कारखानदारांवर कारवाई करा, या मागणीसाठी आंदोलन करणा-या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साखर आयुक्तांच्या कार्यालयाची (साखर संकुल) तोडफोड केली. या प्रकरणी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यासह १४५ आंदोलकांवर गुन्हे दाखल केले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. रात्री उशिरा राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांची अतिरिक्त न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामिनावर सुटका केली.ऊसदराबाबत चर्चा करण्यासाठी साखर आयुक्त डॉ. बिपीन शर्मा यांनी खा.शेट्टी यांना सोमवारी दुपारी भेटीची वेळ दिली होती. त्यानुसार शेट्टी आले. त्यांच्यासोबत शेकडो शेतकरी होते. या आंदोलनाची पूर्वकल्पना असल्याने पोलिसांनी आधीच बंदोबस्त ठेवला होता. शेट्टी यांनी शेतकऱ्यांसह आयुक्तांना भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यावर पोलिसांनी सुरक्षेचे कारण देत त्याला नकार दिला. त्यामुळे शेट्टी आणि खोत यांनी आंदोलकांसह तिथेच ठिय्या दिला. दुपारी दीड वाजेपर्यंत आंदोलन शांततेत सुरू होते. नंतर एकाएकी काही संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी पोलिसांचे कडे भेदून संकुलाच्या मुख्य इमारतीत प्रवेश केला आणि तळमजल्यावरील कार्यालयाची तोडफोड केली. पोलिसांनी आंदोलकांवर दंगल आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान आदी कलमान्वये गुन्हे दाखल केले. खा. शेट्टी यांच्यासह सर्वांना न्यायालयासमोर हजर केले, मात्र त्यांनी जामीन घेण्यास नकार दिल्यामुळे त्यांना अटक करून स्वारगेटजवळील गणेश कला-क्रीडा मंडळाच्या सभागृहात ठेवण्यात आले आहे. मात्र रात्री उशिरा राजू शेट्टींसह त्यांच्या १४२ सहकाऱ्यांना अतिरिक्त न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामिनावर सोडले. (प्रतिनिधी)