शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; पंतप्रधान मोदींनीही केलं खासदाराचं कौतुक!
4
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
5
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
7
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
8
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
9
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
10
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
11
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
12
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!
13
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
14
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
15
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
16
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
17
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
18
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
19
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
20
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...

मिळकतकरात १४.५ कोटींची वाढ

By admin | Updated: November 5, 2016 01:28 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाने आॅक्टोबरअखेर २६० कोटींच्या मिळकत कराची वसुली केली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाने आॅक्टोबरअखेर २६० कोटींच्या मिळकत कराची वसुली केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत साडेचौदा कोटींची अधिक वसुली झाली आहे. मिळकत कर न भरणाऱ्यांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.शहरातील मिळकतकराचा भरणा रोख व डीडीद्वारे एकूण १ लाख ३२ हजार, धनादेशाद्वारे ३६ हजार ३०० व आॅनलाइनद्वारे ७० हजार ३०० मिळकतधारकांनी कर भरला आहे. सप्टेंबरअखेर थकबाकीसह पहिल्या सहामाहीची रक्कम भरणा न केलेल्या मिळकधारकांना २ टक्के प्रतिमहा दराने मनपा शास्तीकर आकारण्यात येणार आहे. तसेच ३१ डिसेंबर २०१६ अखेर दुसऱ्या सहामाहीची रक्कम भरणा न केल्यास दुसऱ्या सहामाही रकमेवरही २ टक्के प्रतिमहा दराने मनपा कर शास्तीची आकारणी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)>नोव्हेंबर २०१६ मध्ये थकबाकी असलेल्या सर्व मिळकतधारकांना मागणीपत्र बजावण्यात येणार आहेत. आर्थिक वर्षात जप्ती अधिपत्र बजाविण्यात आलेल्या ज्या थकबाकीदारांनी अद्यापही मिळकत कराचा भरणा केलेला नाही, अशा थकबाकीदारांच्या मिळकतींची जप्तीची कारवाई सुरू करण्यात येणार आहे.- दिलीप गावडे, सहआयुक्त