शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एसटीत १४,२४७ जागा भरणार !

By admin | Updated: January 5, 2017 04:16 IST

एसटी महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्याने सध्याच्या मनुष्यबळावर कामाचा ताण पडतो. एकंदरीतच एसटीतील रिक्त जागांचा

मुंबई : एसटी महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्याने सध्याच्या मनुष्यबळावर कामाचा ताण पडतो. एकंदरीतच एसटीतील रिक्त जागांचा आढावा घेतल्यानंतर, १४ हजार २४७ विविध पदे भरण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. यामध्ये कोकण विभागासाठी (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर) सर्वाधिक ७ जार ९२३ चालक, तसेच वाहकांची भरती केली जाईल. कोकण विभागात चालक मनुष्यबळाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे आणि तो या भरती प्रक्रियेमुळे सुटू शकतो. चालक-वाहकांच्या भरतीबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रासाठी २ हजार ५४८ लिपिक, ३ हजार २९३ सहायक व ४८३ पर्यवेक्षकांची भरती करण्यात येईल. भरतीची जाहिरात ७ जानेवारीपासून एसटी महामंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया १२ जानेवारीपासून सुरू होईल, तर अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३ फेब्रुवारीपर्यंत असेल, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली. अर्जात अनावधानाने राहून गेलेली अथवा चुकीची माहिती बदलण्याचीही मुभा एसटी महामंडळाकडून उमेदवाराला देण्यात आली आहे. त्यासाठी ६ फेब्रुवारी ते १0 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ असेल. २0१४ मध्ये एसटी महामंडळात मोठी भरती झाली होती. त्यानंतर, महामंडळात भरती प्रक्रिया झाली नाही. दोन वर्षांत एकही जागा भरली न गेल्याने मोठ्या प्रमाणात जागा रिक्त झाल्या. एसटी महामंडळासाठी वर्ग-१ ते वर्ग-४ साठी १ लाख २0 हजार जागा मंजूर असून, सध्याच्या घडीला १ लाख ५ हजारापर्यंत मनुष्यबळ कार्यरत आहे. त्यामुळे रिक्त जागा बघता, या जागा भरण्याच्या सूचना परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी महामंडळाला केल्या होत्या. त्यानुसार, पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)