शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

आयसीटीतून मिळालेले १४०० संगणक अडगळीत

By admin | Updated: September 1, 2016 17:51 IST

संगणकाव्दारे त्यांना शालेय अभ्यासक्रमांचे विषय शिकविणे, यासाठी केंद्रपुरस्कृत आयसीटी (माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान योजना) सन २००७-०८ पासून राबविण्यात येत आहे.

सुनील काकडे, 

वाशिम, दि. 1 - माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान देणे, संगणकाद्वारे त्यांना शालेय अभ्यासक्रमांचे विषय शिकविणे, यासाठी केंद्रपुरस्कृत आयसीटी (माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान योजना) सन २००७-०८ पासून राबविण्यात येत आहे. याअंतर्गत तीन टप्प्यात जिल्ह्याला तब्बल १४०० संगणक मिळाले. मात्र, तज्ज्ञ प्रशिक्षक तथा आवश्यक सुविधांअभावी यातील बहुतांश संगणक आजमितीस अडगळीत पडून असल्याची बाब लोकमतच्या पाहणीत उघड झाली.

केंद्र शासनाने ४ नोव्हेंबर २००८ रोजी घेतलेल्या प्रकल्प नियंत्रण आणि मुल्यमापन गटाच्या बैठकीत संपूर्ण राज्यातील शाळांमध्ये आयसीटी योजना राबविण्यास मान्यता दर्शविली. या योजनेची अंमलबजावणी बीओओटी तत्वावर (बिल्ड ओन आॅपरेट अ‍ॅण्ड ट्रान्सफर) करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार, जिल्ह्यात तीन टप्प्यात १४० शाळांमध्ये संगणक लॅब उभारण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १६ शाळांना प्रती शाळा १० संगणक संच आणि प्रत्येकी १ आॅपरेटर, इलेक्ट्रीक देयक यासह तत्सम सुविधा पुरविण्यात आल्या. त्यात रिसोड तालुक्यात रिसोड, रिठद, मोप येथील श्री शिवाजी विद्यालय, कवठा चिखली येथील पंडित नेहरू विद्यालय, मानोरा तालुक्यातील मानोरा येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी कन्या विद्यालय, शेंदूरजना येथील आप्पास्वामी विद्यालय, कडोळी येथील बाबनाजी महाराज विद्यालय, वाईगौळ येथील तपस्वी काशीनाथ बाबा हायस्कुल आश्रमशाळा, धामणी येथील एलएसपीएम विद्यालय, मालेगांव तालुक्यातील मालेगाव येथील ना. ना. मुंदडा विद्यालय, जऊळका रेल्वे, किन्हीराजा येथील श्री शिवाजी विद्यालय, शिरपूर येथील कोंडबातात्या ढवळे विद्यालय, मुंगळा येथील मोरेश्वर विद्यालय आणि खंडाळा येथील समाज प्रबोधन विद्यालयाचा समावेश आहे.

दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ५६ शाळा या योजनेसाठी पात्र ठरल्या; तर तिसऱ्या टप्प्यात तब्बल ६७ शाळांमध्ये आयसीटी योजनेतून संगणक लॅब उभारण्यात आली. असे असले तरी १४० शाळांपैकी बहुतांश शाळांमधील संगणक लॅब चक्क बंद असून तज्ज्ञ प्रशिक्षक, विद्यूतची सोय नसणे, इमारतींची दुरवस्था आदी कारणांमुळे अनेक ठिकाणचे आजही धूळखात पडून आहेत. परिणामी, शासनाचा मूळ उद्देश असफल झाला असून ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी या महत्प्रयासानंतरही संगणकीय शिक्षणात माघारला आहे.