शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पात्रतेसाठी रातोरात १४० नव्या झोपड्या उभ्या

By admin | Updated: May 25, 2015 03:59 IST

विमानतळालगत वसलेल्या झोपड्यांची पात्रता निश्चित करण्याच्या बातमीचा सुगावा लागताच कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरमध्ये रात्रीच्या वेळी अनधिकृत झोपड्या

मुंबई : विमानतळालगत वसलेल्या झोपड्यांची पात्रता निश्चित करण्याच्या बातमीचा सुगावा लागताच कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरमध्ये रात्रीच्या वेळी अनधिकृत झोपड्या उभारणीला वेग आला आहे. गेल्या काही रात्रींमध्ये या परिसरात झोपडपट्टीदादांकडून १४० हून अधिक झोपड्या उभारल्या असून, सर्व्हेमध्ये अधिकृत झोपड्यांच्या पात्रतेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. तर नव्या झोपड्यांमुळे विमानतळाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.अपर जिल्हाधिकारी (सक्षम प्राधिकारी) यांच्याकडून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील म्हणजे जरीमरी, संदेश नगर, क्रांती नगर आणि सेवक नगरमधील झोपड्यांची पात्रता निश्चित करण्याचे काम १८ मे पासून हाती घेण्यात आले. हे काम करण्यासाठी घटनास्थळी दाखल होणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संबंधित रहिवाशांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रे व पुरावे सादर करावेत, असे आवाहन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केले. हे काम सुरू असतानाच कुर्ला पश्चिमेकडील मिठी नदीलगत आणि विमानतळाच्या भिंतीला लागून वसलेल्या क्रांती गरमध्ये अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे.गेल्या काही रात्रींदरम्यान क्रांती नगरमध्ये अनधिकृत झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. या सर्व झोपड्या पत्र्याच्या असून, त्या पात्र करून घेण्यासाठी दलालांकडून तब्बल ८ लाखांची मागणी केली जात असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे कलिना विधानसभा सचिव राकेश पाटील यांनी दिली. वीज, पाणी उपलब्ध नसतानाही या झोपड्यांचा बोलबाला आहे. दलालांचा दबदबा असल्याने स्थानिक रहिवासी बोलण्यास कचरत आहेत. दरम्यान, पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन शासनातर्फे कुर्ला प्रीमिअर आॅटोमोबाइल परिसरात करण्याचे प्रस्तावित असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)