शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

‘युतीमधील एकोप्याअभावी १४ वर्षांचा वनवास’

By admin | Updated: January 21, 2017 04:35 IST

भाजपा व शिवसेना हे नैसर्गिक मित्र आहेत. अनेक निवडणुकांमध्ये आमची युती राहिली

जळगाव : भाजपा व शिवसेना हे नैसर्गिक मित्र आहेत. अनेक निवडणुकांमध्ये आमची युती राहिली. परंतु एकोप्याने निवडणुकीला सामोरे न गेल्याने २००० ते २०१४ अशी १४ वर्षे आम्ही सत्तेपासून दूर राहिलो, असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले. पाटील यांनी शुक्रवारी ‘लोकमत’च्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. भाजपाचे सेनेशी काही मुद्द्यांवर मतभेद आहेत. मात्र राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांसारखे आमच्यात मनभेद नाही, त्यामुळे त्याचा विकास कामांवर फार काही परिणाम होत नाही, असे ते म्हणाले. युती करायची आणि एखादी जागा जास्त आली म्हणून वर्चस्वासाठी लढायचे यामुळे सत्ता दूर राहिली. मात्र आता बदलले पाहिजे. सेना व भाजपाच्या उद्दिष्टासाठी सत्ता आली पाहिजे नंतर ‘वितरणा’साठी भांडणे करू, असे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कुरघोड्या थांबणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.भाजपाने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्व तयारी केली आहे. आम्हाला ११४ जागा कोणत्या हव्या आहेत. त्याची यादी आम्ही शिवसेनेला दिली आहे. भाजपाचे १६ आमदार आहेत. सहाजिक आपल्या मतदार संघातील, वॉर्डात कार्यकर्त्यांना संधी मिळावी, अशी त्यांची इच्छा असल्याची भूमिका त्यांनी मांडली.भाजपा व शिवसेना युतीबाबत मी व्यवहार व तत्त्वज्ञान या दोन गोष्टी मानतो. व्यवहार म्हटला तर २०१३ मध्ये शिवसेनेकडे जास्त जागा होत्या. २०१४ मध्ये स्थिती बदलली आणि भाजपा मोठा पक्ष झाला. त्यावेळी व्यवहार म्हणून दोघांना एकत्र यावे लागले. पण तत्त्वज्ञान म्हणून, भाजपा व शिवसेना हे नैसर्गिक मित्र आहेत. दोघांचा राजकीय अजेंडा एक नसला तरी उद्दिष्ट मात्र एक आहे. कुठे जायचे, काय साधायचे हे आमचे समान तत्त्व आहे, असा दावा त्यांनी केला. (प्रतिनिधी) >युती म्हणून आम्ही जे मानतो ते शिवसेनेने मानले पाहिजे. एका कुटुंबात एका भावाचे खूप चालते. काळाच्या ओघात दुसरा भाऊ मेहनतीने मोठा झाल्यास आई-वडील त्याचे ऐकतात. त्यामुळे आधी ज्याचे घरात चालायचे तो घर सोडून जात नाही. या साऱ्यात त्या मुलाच्या मनात दु:ख, असूया राहते. शिवसेना व भाजपा युतीचेदेखील तसेच आहे. - चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री