शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सोसायटीच्या छतावर रोज १४ युनिट वीजनिर्मिती

By admin | Updated: March 9, 2016 04:22 IST

महावितरणच्या वाशी परिमंडळ क्षेत्रामध्ये छतावर वीजनिर्मितीचा पहिला प्रकल्प पनवेलमध्ये डॉ. प्रशांत गायकवाड यांच्या घरावर सुरू करण्यात आला आहे. ३.५ किलोवॅट क्षमतेची यंत्रणा बसविण्यात आली

नवी मुंबई : महावितरणच्या वाशी परिमंडळ क्षेत्रामध्ये छतावर वीजनिर्मितीचा पहिला प्रकल्प पनवेलमध्ये डॉ. प्रशांत गायकवाड यांच्या घरावर सुरू करण्यात आला आहे. ३.५ किलोवॅट क्षमतेची यंत्रणा बसविण्यात आली असून, त्यापासून रोज १४ युनीट वीजनिर्मिती होणार आहे. केंद्र व राज्य शासनाने अपारंपरिक ऊर्जानिर्मितीकडे गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. अपारंपरिक ऊर्जानिर्मितीला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून छतावर सौरऊर्जानिर्मिती यंत्रणा उभारणाऱ्या नागरिकांचा सन्मान करण्याच्या सूचना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत. यापूर्वी मुंबईतील भाजपा खासदार किरीट सोमय्या व ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर येथील कार्यालयाच्या छतावर अशाप्रकारची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरामध्ये अद्याप अशाप्रकारचा एकही प्रकल्प सुरू झाला नव्हता. पनवेलमधील डॉ. प्रशांत गायकवाड यांनी त्यांच्या घराच्या छतावर ३.५ किलोवॅट क्षमतेची यंत्रणा बसविलेली आहे. या माध्यमातून रोज १४ युनिट वीजनिर्मिती होणार आहे. हा पहिलाच प्रयोग असल्यामुळे भांडुप नागरी परिमंडळाचे मुख्य अभियंता सतीश करपे यांनी गायकवाड यांच्या घरी जाऊन त्यांचा विशेष सत्कार केला. भावी पिढीच्या आरोग्यदायी जीवनाच्या अनुषंगाने पर्यावरणाची जपणूक करणाऱ्या सौरऊर्जानिर्मितीस वाव मिळावा, यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या विनियमन २०१५ प्रमाणे वैयक्तिक नागरिक व संस्था त्यांच्या छतावर अशाप्रकारची यंत्रणा बसवू शकतात, असे मुख्य अभियंता अभियंता सतीश करपे यांनी सांगितले. गायकवाड यांनी उभारलेली सोलर नेट मीटरिंग यंत्रणा हा या परिसरातील पहिलाच प्रयोग असल्याने शहरामध्येही या प्रकल्पाचे कौतुक होत आहे. महावितरण अधिकाऱ्यांनी गायकवाड यांच्या पनवेल सेक्टर २ मधील घरी जाऊन सत्कार केला तेव्हा वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर मानकर, कार्यकारी अभियंता जफर खान, डी. व्ही. गोसावी, पी. एन. वडनेरे व इतर अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी) > एक महिन्यात १० प्रकल्प सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर व्हावा, यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. महावितरणच्या भांडुप परिमंडळामध्ये मार्चअखेरपर्यंत १० सौरऊर्जानिर्मिती यंत्रणा कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यापुढे नियमितपणे नागरिकांना यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार असून, अशाप्रकारचा प्रकल्प राबविणाऱ्यांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला जाणार असल्याचेही सतीश करपे यांनी सांगितले.