शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

१४ टक्क्यांची सेवा कर आकारणी बेकायदा!

By admin | Updated: April 3, 2015 02:35 IST

केंद्रीय अर्थसंकल्पात सेवा कराचे प्रमाण १२.३६ टक्क्यांवरून (सर्व अधिभारांसह) १४ टक्के इतके करण्यात आले असले तरी अद्यापही त्याची अधिसूचना

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पात सेवा कराचे प्रमाण १२.३६ टक्क्यांवरून (सर्व अधिभारांसह) १४ टक्के इतके करण्यात आले असले तरी अद्यापही त्याची अधिसूचना निघालेली नाही. मात्र अनेक व्यापाऱ्यांनी १४ टक्के दराने सेवा कराची आकारणी सुरू केली असून, जोपर्यंत अधिसूचना निघत नाही तोपर्यंत अशी १४ टक्क्यांची आकारणी बेकायदा असल्याचे केंद्रीय सेवा कर विभागाने स्पष्ट केले आहे. अर्थसंकल्पात स्वस्त व महाग होणाऱ्या गोष्टींसोबतच करातील बदलांची जी घोषणा होते. त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून अर्थात नव्या आर्थिक वर्षापासून होते. पण कर रचनेसंदर्भात सरकारतर्फे अधिसूचना प्रसिद्ध होते आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी होते. साधारणपणे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ही अधिसूचना प्रसिद्ध होते. परंतु, यंदा सेवा करात १२.३६ टक्क्यांवरून १४ टक्के इतकी वाढ करतानाच त्यात स्वच्छ भारत अभियानासाठीचा अधिभारही समाविष्ट करण्याचा सरकारचा विचार आहे. परंतु, सध्याच्या कर रचनेत शैक्षणिक व उच्चशिक्षणाचा अधिभार लागू असून, त्यात हा नवा अधिभार लागू करून त्यानुसार कराचे गणित जमवावे लागणार आहे. यामुळेच अधिसूचनेला विलंब झाल्याचे समजते. अधिसूचना जरी निघालेली नसली तरी आता १ एप्रिलपासून व्यापाऱ्यांनी १४ टक्के दराने सेवाकराची आकारणी सुरू केली आहे. पण, अद्यापही वाढीव सेवाकराची अधिसूचनाच निघालेली नसल्याने गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली १४ टक्क्यांची आकारणी ही बेकायदा आहे. जोपर्यंत वाढीव कराची अधिसूचना प्रसिद्ध होत नाही तोवर लोकांनी तो भरू नये, तसेच जर कुणी हा भरण्याची सक्ती केलीच तर त्यासंदर्भात थेट सेवा कराच्या विभागीय कार्यालयात तक्रार करावी, असे आवाहन विभागाने केले आहे.