शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

देशभरातून 'इसिस'च्या १४ संशयितांना अटक

By admin | Updated: January 22, 2016 14:05 IST

सार्वजनिक ठिकाणी दहशतवादी हल्ल्याची योजना आखणा-या इसिसच्या संशयितांना एनआयएने देशाच्या विविध भागात छापा मारुन अटक केली आहे.

 
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. २२ - सार्वजनिक ठिकाणी दहशतवादी हल्ल्याची योजना आखणा-या इसिसच्या संशयितांना एनआयएने देशाच्या विविध भागात छापा मारुन अटक केली आहे. एनआयएने मुंबईतून दोन, उत्तरप्रदेशमधून दोन, कर्नाटकमधून सहा जणांना आणि हैदराबादमधून चौघांना अटक केली आहे.
 'इसिस' ( इस्लामिक स्टेट) या कुख्यात दहशतवादी संघटनेची मुळे आता मुंबईपर्यंत पोहोचल्याची शंका असून एटीएस व एनआयने संयुक्तरित्या कारवाई करून ठाण्यातून 'इसिस'च्या एका संशयिताला अटक केली आहे. इसिसशी संपर्कात असल्याचा आरोप त्या तरूणावर असून राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) त्याला अटक केली.  अटक करण्यात आलेला हा तरूण मुंब्रा येथील रहिवासी असल्याचे समजते. 
दरम्यान इसिसशी संपर्कात असल्याच्या संशयावरून कर्नाटकातूनही दोन जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे. कर्नाटकातील मंगळुरू आणि टुमकूरमधून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. 
गेल्या महिन्यातच मुंबईच्या मालवणी परिसरातील काही तरूण इसिसमध्ये सामील होण्यासाठी निघाल्याचे वृत्त होते, तर त्याआधी मे २०१४ मध्ये कल्याणमधील चार युवक इसिसमध्ये सामील होण्यासाठी सीरियाला रवाना झाले होते, त्यातील एक तरूण अरीब माजिदला देशात परत आला असून सध्या तो एनआयएच्या कोठडीत आहे.