शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
5
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
6
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
7
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
8
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
9
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
10
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
11
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
12
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
13
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
14
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
15
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
16
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
17
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
18
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
19
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
20
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका

१४ कोटींच्या रुईगाठी भस्मसात

By admin | Updated: August 12, 2014 01:04 IST

स्थानिक महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामाला लागलेल्या आगीत १४ कोटी रुपये किंमतीच्या सात हजार रुईगाठी भस्मसात झाल्या. आग इतकी भीषण होती की तब्बल १० तासांनी आटोक्यात आली.

वखार महामंडळाच्या गोदामाला आग : सीसीआय, व्यापाऱ्यांचा मालयवतमाळ : स्थानिक महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामाला लागलेल्या आगीत १४ कोटी रुपये किंमतीच्या सात हजार रुईगाठी भस्मसात झाल्या. आग इतकी भीषण होती की तब्बल १० तासांनी आटोक्यात आली. ही आग नेमकी कशाने लागली हे मात्र कळू शकले नाही. दारव्हा मार्गावरील वखार महामंडळाच्या या गोदामात शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचा माल ठेवलेला आहे. कोट्यवधीच्या रुईगाठीही गोदामात आहेत. रविवारी १० आॅगस्टच्या रात्री १ ते १.३० च्या सुमारास गोदाम क्र.१ मध्ये अचानक आग लागली. हा प्रकार सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आला. त्याने त्वरित यंत्रणेला माहिती दिली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. मात्र आग आवाक्याबाहेर असल्याचे तहसीलदार अनुप खांडे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ इतर तालुक्यातील अग्निशमन दलाची मदत मागविली. पहाटेच्या सुमारास नेर, आर्णी आणि पुसद येथील वाहनेही घटनास्थळी दाखल झाली. आगीमुळे गोदामाचे लोखंडी छत वितळून खाली कोसळले. परिणामी आग पुन्हा वाढली. शेजारी असलेल्या गोदामालाही आग लागण्याचा धोका होता. त्यामुळे युनिट क्र.२ मध्येही पाण्याचा मारा करण्यात आला. दरम्यान, आग नियंत्रित करण्यासाठी जेसीबी मशीनने गोदामाचे शटर तोडण्यात आले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या गोदामात सीसीआय आणि खासगी व्यापाऱ्यांच्या ७ हजार ७८८ रुईगाठी ठेवलेल्या होत्या. एका गाठीची किंमत १८ हजार रुपये असून तब्बल १४ कोटी १९ लाख रुपयांच्या गाठी भस्मसात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (शहर वार्ताहर)