शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पवन ऊर्जेतून सार्इंना १४ कोटींचे दान

By admin | Updated: December 29, 2015 01:45 IST

अंगारे, धुपारे न देता, फक्त श्रद्धेवर भक्तांना आत्मशांती मिळवून देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांच्या झोळीत विज्ञानाच्या चमत्कारामुळे पवन ऊर्जेतून मिळालेल्या उत्पन्नातील १४ कोटी रुपये आले आहेत.

- मिलिंदकुमार साळवे,  अहमदनगरश्रीरामपूर (अहमदनगर) : अंगारे, धुपारे न देता, फक्त श्रद्धेवर भक्तांना आत्मशांती मिळवून देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांच्या झोळीत विज्ञानाच्या चमत्कारामुळे पवन ऊर्जेतून मिळालेल्या उत्पन्नातील १४ कोटी रुपये आले आहेत.अहमदनगरजवळील भोयरे पठार येथील डोंगर रांगांवर संस्थानने १५ कोटी ४० लाख रुपये खर्चून २.५ मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. २०१४-१५ आर्थिक वर्षात त्यातून ४४ लाख ८८ हजार ८१ युनिट वीजनिर्मिती झाली. ती महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीस विकण्यात आली. त्यातून संस्थानला २०१४-१५ मध्ये २ कोटी १४ हजार ४९२ रुपयांचे उत्पन्न मिळाले. प्रकल्प कार्यान्वित केल्यापासून साईबाबांच्या संस्थानरूपी झोळीत मार्च २०१५ अखेर १४ कोटी २२ लाख १६ हजार ६०१ रुपये एवढी रक्कम जमा झाली. २०११-१२ मध्ये ४८ लाख ४० हजार ९९७ युनिट वीजनिर्मिती होऊन संस्थानला १ कोटी ९४ लाख ४९ हजार २३८ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. २०१०-११ मध्ये पवन ऊर्जा प्रकल्प व कार्बन क्रेडिटद्वारे २ कोटी २ लाख २९ हजार १३० रुपये मिळाले होते. २०१२-१३ मध्ये पवन ऊर्जा प्रकल्पातून २ कोटी ५ लाख २७ हजार ३७२ रुपये इतका महसूल मिळाला.