- विलास बारी, जळगावकर्जबाजारीपणा, नापिकी आणि निसर्गाच्या लहरीपणाला कंटाळून २०१५च्या पहिल्या नऊ महिन्यांत कृषिमंत्र्यांच्या जळगाव जिल्ह्यात १३६ शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग निवडल्याचे जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्या जिल्ह्यातच शेतकरी आत्महत्येनंतर वारसांनी दाखल केलेल्या मदतीसाठीचे ८१ प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीने अपात्र ठरविले तर ३९ प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याने पीडितांची वणवण कायम आहे.पाचोरा व चाळीसगाव तालुक्यात शेतकरी आत्महत्येच्या सर्वाधिक घटनांची नोंद झाली आहे. दोन वर्षांपासून अवर्षण व अवकाळी पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत.कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यात १, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यात १४ व माजी पालकमंत्री आ. डॉ. सतीश पाटील यांच्या पारोळा तालुक्यात १७ शेतकऱ्यांनी जीवन संपविले, असे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
कृषिमंत्र्यांच्या गावात १३६ आत्महत्या
By admin | Updated: October 20, 2015 01:28 IST