शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १३४ शाळा अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2015 02:23 IST

शाळांची व विद्यार्थ्यांची गुणवत्तावाढ, शाळांचे डिजिटलायझेशन करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या संदर्भात एकीकडे शासन प्रयत्न करीत

अजित मांडके,  ठाणेशाळांची व विद्यार्थ्यांची गुणवत्तावाढ, शाळांचे डिजिटलायझेशन करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या संदर्भात एकीकडे शासन प्रयत्न करीत असताना दुसरीकडे मात्र शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे ठाणे जिल्ह्यातील शहापूर या आदिवासी तालुक्यातील १३४ शाळांचा वीजपुरवठा बिल न भरल्याने खंडित केला असून गेली अनेक महिने या शाळांमधील हजारो विद्यार्थी अंधारातच शिक्षण घेत आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या ३४१ शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी अजून संगणकाचे तोंडही पाहिले नसल्याचे उघड झाले आहे. आदिवासी तालुका असलेल्या शहापूर तालुक्यामध्ये गोरगरीब आदिवासी व कष्टकऱ्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी सुमारे ४८६ प्राथमिक शाळा सध्या सुरू आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व शाळा डिजीटल शाळा करण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. परंतु, शाळांमध्ये संगणकच न पोहचल्याने शिक्षण विभागाकडून व जिल्हा प्रशासनाकडून पालकांची दिशाभूल व गोरगरीब मुलांना संगणक शिक्षणापासून वर्षानुवर्षानुवर्षे वंचित ठेवले आहे. ४८६ पैकी फक्त १२७ शाळांमध्ये संगणक शिकण्याची सोय असून ३४१ शाळांमध्ये अद्याप एकही संगणक पोहचलेला नाही, तर संगणक मिळालेल्या शाळांमध्ये वीजपुरवठा वीज बिल न भरल्याने महावितरणे खंडित केला आहे. अनेक शाळा संगणकाशिवाय, लाईट व पंख्यांशिवाय सुरु आहेत. विद्यार्थ्यांना अंधारातच अभ्यास करावा लागत आहे. शाळेचे विजेचे बिल भरण्यासाठी शिक्षण विभागाने व जिल्हा प्रशासनाने आर्थिक तरतूद न केल्याने सुमारे १३४ शाळा अंधारात आहेत. याला शिक्षण विभाग व जिल्हा प्रशासन जबाबदार असून हीच परिस्थिती ठाणे जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये सुद्धा आहे. प्राथमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षणाबद्दल सातत्याने गळा काढणाऱ्या शिक्षण विभाग व जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा देण्याची आवश्यकता आहे. हा प्रकार म्हणजे शिक्षण हक्क विधेयकाचे उल्लंघन असून संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात आमदार रामनाथ मोते हे मुंबई उच्च न्यायालयात लवकरच जनिहत याचिका दाखल करणार असल्याचे शिक्षक परिषदेचे मुंबई उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले.