शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

उच्च शिक्षणासाठी १३०० कोटींचा निधी

By admin | Updated: April 18, 2017 05:43 IST

उच्च शिक्षणासाठी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाअंतर्गत (रूसा) १३०० कोटी रुपयांचा निधी विविध महाविद्यालये व विद्यापीठांना उपलब्ध करून देण्यात आला आहे

पुणे : उच्च शिक्षणासाठी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाअंतर्गत (रूसा) १३०० कोटी रुपयांचा निधी विविध महाविद्यालये व विद्यापीठांना उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. उच्च शिक्षणातील गुणवत्ता सुधारण्यासाठी या उपक्रमाचा चांगला फायदा होऊ शकेल, असे जावेडकर यांनी या वेळी सांगितले.देशभरातील विविध विद्यापीठांमधील १७ प्रकल्पांचे उद्घाटन प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आॅनलाइन करण्यात आले. त्यापैकी एक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर इंटेलिजेन्ट सिस्टिम’ (सीआयएस) या केंद्राचे उद्घाटन जावडेकर यांनी दिल्लीतील मंत्रालयात बसून केले. या वेळी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुंबईतून तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, रूसाच्या कन्सलटंट डॉ. जया गोयल, शक्ती सिंग, तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर सहभागी झाले. जम्मू आणि काश्मीर, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, झारखंड आदी राज्यांमधील १७ प्रकल्पांचे उद्घाटन झाले. या वेळी त्या - त्या राज्यांचे शिक्षणमंत्री, विद्यापीठांचे कुलगुरू, प्राचार्य यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेतला.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागांतर्गत सीआयएस सुरू करण्यात आले आहे. या सीआयएसच्या वतीने हातातील बोटांच्या ठशांचा आधार घेऊन सर्व आर्थिक व्यवहार करणारी ‘मायक्रो एटीएम’ मशीन शोधून काढली आहेत. त्यासाठी नागरिकांचा आधारकार्डचा डेटा बँक खात्याशी जोडावा लागणार आहे. परिणामी, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डऐवजी आता सर्व व्यवहार बायोमेट्रिकच्या आधारे करता येणार आहेत. सीआयएसला रूसाअंतर्गत पुढील ५ वर्षांसाठी १० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यापैकी दीड कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत मिळाल्याची माहिती डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी दिली. (प्रतिनिधी)