शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

विषारी दारूने घेतले १३ बळी!

By admin | Updated: June 19, 2015 03:40 IST

विषारी दारू प्यायल्याने मालाडच्या मालवणी परिसरात १३ जणांचा बळी गेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. यातील ११ जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांना व्हेंटिलेटरवर

मुंबई : विषारी दारू प्यायल्याने मालाडच्या मालवणी परिसरात १३ जणांचा बळी गेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. यातील ११ जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. बळींची संख्या वाढण्याची भीती आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने राजू लंगडा व शंकर या दोन दारू विक्रेत्यांना ताब्यात घेतले. लक्ष्मीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात बिगारी कामगार, मजूर आणि रोजंदारीवर काम करणारे कुटुंबीय राहतात. बुधवारी रात्री येथील नागरिकांनी गावठी दारूचे प्राशन केले. गुरुवारी पहाटेपासून त्यांची प्रकृती खालावण्यास सुरुवात झाली. अनेकांना उलट्या-जुलाब, छातीत दुखणे, चक्कर येणे असा त्रास होऊ लागला. त्यांना मालाडच्या खाजगी व शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना विषबाधा झाल्याचे निदान डॉक्टरांनी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. अकरापैकी तिघांचा मृत्यू प्राईम रुग्णालयात, ५ जणांचा शताब्दी रुग्णालयात, एकाचा सिद्धार्थ रुग्णालयात तर ४ जणांचा पालिका रुग्णालयात मृत्यू झाला. ११ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच मालवणी पोलिसांसह गुन्हे शाखेनेही घटनास्थळी धाव घेतली. इथिल अल्कोहोलपासून ही विषारी दारू बनविण्यात आल्याची माहिती समोर आली. सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील देशमुख यांनी सांगितले की, उपचार घेणाऱ्या नागरिकांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. तसेच याचा अधिक तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. गुन्हे शाखेचे सहआयुक्त देवेन भारती, उत्तर परिक्षेत्राचे अप्पर आयुक्त फत्तेसिंह पाटील रात्री उशिरापर्यंत मालवणी पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पाटील यांनी लोकमतला सांगितले.पोलिसांचे कोम्बिंग आॅपरेशन-मालवणी खारोडी गावातल्या गावदेवी परिसरातील लक्ष्मीनगर झोपडपट्टी परिसरात लंगडा, शंकर हे दोघे गेल्या अनेक वर्षांपासून देशी-गावठी दारू विक्रीचा व्यवसाय करत होते. -देशी दारूच्या बाटल्या फोडून त्या छोट्या छोट्या पाऊचमध्ये ते विकत असल्याची माहिती समोर आली आहे. अशाप्रकारे विक्री करताना ते दारूत मिथेनॉल किंवा मिथाईल हे औद्योगिक रसायन मिसळून विकत असावेत, असा संशय आहे. पोलिसांनी हस्तगत केलेल्या दारूचे नमुने कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी धाडण्यात आले आहेत.-या घटनेनंतर पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी तत्काळ या घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला. स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेने कोम्बिंग करून संशयितांना ताब्यात घेतले.वरिष्ठ निरीक्षकावर कारवाई?मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश पाटील यांच्यावर या दारूकांडानंतर तरी आयुक्त मारिया कारवाई करणार का, असा सवाल निर्माण झाला आहे. २००४मध्ये विक्रोळी व ना. म. जोशी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दारूकांड घडल्यानंतर वरिष्ठ निरीक्षकापासून उपायुक्तांपर्यंत सहा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. याप्रकरणी राजू लंगडा व शंकर या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. सर्वांनी नेमकी कोणती दारू प्यायली, ती कुठून आली, याबाबतची माहिती गोळा केली जात आहे.- धनंजय कुलकर्णी, पोलीस प्रवक्तेमृतांची नावे : मेहबूब हुसेन शेख (४३), दिनेश कनोजिया (४०), दत्तात्रय धोंडे घमरे (५३),कन्हेही सकाई हरिजन (४०), रोहित दगडू भालेराव (२४), लक्ष्मण येमापुरे (४०), अशोक हरिश खेमाडी(२५), रमेश रामतेकर(४०), सत्यवान भिकू म्हात्रे (४०), विजय रवी गजाला (२७), प्रमोद चव्हाण, किसन सोनवणे, देविड आरोग्यस्वामी चेट्टीयार.यांच्यावर उपचार सुरू : पॉल चेट्टीयार (६२), दयानंद मोहिते (३६), प्रदीप गालांडे (३०), फुलचंद गुलाब कनोजिया, अब्दुल अजिज शेख हुसेन (४५), कमलेश रामदुलार कनोजिया (३८), बबलू सुधाकर गालाते (३३), अशोक कनोजिया, दत्ता जयंत सोनावणे, मोहन कांचन शिंदे (३०)