शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

रेतीची अवैध वाहतूक करणारे १३ ट्रक जप्त

By admin | Updated: October 28, 2016 20:20 IST

देवळी तालुक्यातील पुलगाव येथील वर्धा नदीच्या घाटाजवळ महसूल प्रशासनाने धाडसत्र राबवून रेतीचे १३ ट्रक जप्त केले आहे.

ऑनलाइन लोकमतवर्धा, दि. 28 - देवळी तालुक्यातील पुलगाव येथील वर्धा नदीच्या घाटाजवळ महसूल प्रशासनाने धाडसत्र राबवून रेतीचे १३ ट्रक जप्त केले आहे. प्रत्येकी दोन ब्रास याप्रमाणे १३ ट्रकमधील २६ ब्रास रेती जप्त करून सर्व ट्रक देवळीच्या तहसील कार्यालयात लावण्यात आले. ही कारवाई शुक्रवारी सकाळी करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई बाकी होती. गौण खनिजाची चोरी करून रेतीची अवैध वाहतूक करण्यात येत असल्याच्या माहितीवरून देवळीचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार बाळू भागवत, नायब तहसीलदार वरपे, पटवारी व्ही.आर. झाडे, जे.एम. बुरांडे, के.एस. बुडगे यांच्या चमूने सापळा रचून ही कारवाई केली. अधिकाऱ्यांची ही चमू पुलगावच्या रेती घाटाजवळ दबा धरून बसले असता रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या या १३ ट्रकवर कारवाई करण्यात आली.या कारवाईत एमएच ३४ ए ६९७९, एमएच ३४ एम ४१, एमएच २७ एक्स ५१२५, एमएच ३० एल १११०, एमपी १०४, जीए ०२२४, एमएच २७ एक्स १९७०, एमटी ४- ८३२१, एमएच ०४-सीयु ७४९६, एमएच २७ एक्स २०२३, एमएच ३० ए ९१५२, एमएच २७ एक्स ५८२९, एमडब्ल्यूवाय ७७०६, एमएच २७ एक्स ५८६३ आदी ट्रकचा समावेश आहे. ही कारवाई आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास करण्यात आली. प्रत्येक ट्रकमधील दोन ब्रास रेती मागे आठ हजार व त्याचे पाच पट अशा पद्धतीने प्रत्येकी ट्रकमागे ४० हजार रुपयांचा दंड आकारून उपविभागीय अधिकाऱ्याच्या निर्देशावरून पोलीस कारवाई सुद्धा करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार बाळू भागवत यांनी दिली. त्यामुळे रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणात कारवाई करण्यात आली नव्हती. पुलगाव येथे रेती माफियांची साखळी कार्यरत असल्याने याठिकाणी रेती चोरीचे प्रमाण नित्याचेच झाले आहे. ह्यजिसकी जीतनी भागीदारीह्ण या तत्वानुसार १५ ते २० ठेकेदारांची टोळी एकत्र येवून मोठ्या रकमेचे ठेके घेतले जात आहे. नदीपलिकडे यवतमाळ जिल्ह्यात ठेके घेऊन वर्धा जिल्ह्यातील रेतीची चोरी केली जात आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांच्या महसुलला चुना लावला जात आहे.पोलीस कारवाईकरिता विलंबामुळे अनेक संशयमहसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकाळी ६ वाजताच्या सुमारास ही कारवाई केली. असे असताना रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात कारवाई का करण्यात आली नाही, हे न उलगडणारे कोडे आहे. पुलगावात रेती माफीयाचे मोठे जाळ असून कोट्यवधीचा काळा व्यवहार चालतो. याच आर्थिक व्यवहाराकरिता हा विलब होत असल्याचा संशय येथे बळावत असल्याची चर्चा आहे. रेती घाटावरील नाही ठिय्यावरील? ४महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेली ही रेती वर्धा नदी घटावरील असल्याचे सांगितले जात आहे. मात्र ही रेती येथे लावण्यात आलेल्या ठिय्यावरील असल्याची चर्चा परिसरात आहे. जर खरच ही रेती ठिय्यांवरील असेल तर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कारवाईचे स्थळ बदलविण्यामागचे कारण काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.