शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

महापालिकेत नोकरीचे अामिष दाखवून १३ लाखांची फसवणूक

By admin | Updated: July 26, 2016 23:28 IST

वेगवेगळया तरुणांकडून १३ लाखांची फसवणूक करणाऱ्या विष्णु मोरे याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 26 - ठाणे महापालिकेत कायमस्वरूपी नोकरीचे आमिष दाखवून सहा वेगवेगळया तरुणांकडून १३ लाखांची फसवणूक करणाऱ्या विष्णु मोरे याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याला २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.ठाण्यातील नौपाडा परिसरातील रहिवाशी योगिता मांडवकर यांच्या मुलीला ठामपामध्ये लिपीक म्हणून नोकरी लावण्याचे अमिष त्याने दाखविले होते. पालिकेतील मोठया साहेबांची ओळख असल्यामुळे कायमस्वरुपी नोकरी लावण्याची त्याने बतावणी करुन त्यांच्याकडून त्याने दोन लाख ५० हजार रुपये घेतले होते. आणखीही काही जागा भरायच्या असून लिपीकसाठी दोन लाख तर शिपाई पदासाठी दीड लाखांचा भाव असल्याचे सांगून त्याने जून २०१२ ते २०१५ या तीन वर्षांच्या कालावधीत सहा जणांकडून दहा लाख ५० हजार असे तब्बल १३ लाख रुपये त्याने घेतले. यामध्ये नौपाडयातील मांडवकर यांच्यासह दोघे, सांताक्रूझ, रत्नागिरी, डोंबिवली आणि डोळखांब, शहापूर येथील प्रत्येकी एकाची फसवणूक झाली. पैसेही नाही आणि मुलीला नोकरीही न लावल्याने मांडवकर यांनी याप्रकरणी २५ जुलै रोजी तक्रार दाखल केल्यावर मोरेला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक हणमंत ओऊळकर हे अधिक तपास करीत आहेत.