शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

13 आरोपींना मोक्काअंतर्गत प्रत्येकी 12 वर्षे सश्रम कारावास

By admin | Updated: December 22, 2016 20:56 IST

१३ आरोपींना विशेष सत्र न्यायाधीश एस.एस. गोसावी यांनी मोक्का कायद्यांतर्गत प्रत्येकी बारा वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी दहा लाख रुपये प्रमाणे एकूण एक कोटी तीस लाख रुपये दंड ठोठावला.

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 22 -  अहमदनगर जिल्ह्यातील कोठेवाडी येथील दरोडा व सामूहिक अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एकूण १३ आरोपींना विशेष सत्र न्यायाधीश एस.एस. गोसावी यांनी मोक्का कायद्यांतर्गत प्रत्येकी बारा वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी दहा लाख रुपये प्रमाणे एकूण एक कोटी तीस लाख रुपये दंड ठोठावला. तत्कालीन पोलिस निरीक्षक केशव बाबुराव रणदिवे हे पाथर्डी पोलिस ठाण्यात कार्यरत असताना त्यांच्या असे निदर्शनास आले की, कोठेवाडी येथील दरोडा व सामुहिक अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एकुण १३ आरोपींची संघटीत गुन्हेगारी करणारी टोळी आहे. या टोळीने अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील पाथर्डी, गंगापूर, सिल्लेगाव या पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात मागील दहा वर्षात दरोडा , बलात्कार आणि सामुहिक बलात्कारासारखे अनेक गंभीर गुन्हे वैयक्तिक आणि सांघीकरित्या केले आहेत. म्हणुन तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी एम.एम. बेलदार यांनी सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेवून वरील आरोपींविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत वेगळा गुन्हा नोंदवून तपासाअंती औरंगाबादच्या विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्याच्या सुनावणीच्यावेळी तत्कालीन सरकारी अभियोक्ता राजेंद्र मुगदिया आणि विद्यमान सरकारी अभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी एकुण ११ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती विशेष न्यायालयाने बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामधील आरोपी दारासिंग उर्फ मारुती वकिल्या भोसले , रमेश उर्फ रेच्या धुपाजी काळे,बंडु उर्फ बबन उत्तम भोसले, हबीब उर्फ हब्या पानमळ्या भोसले, गारमण्या खुबजत चव्हाण, राजू उर्फ अंदाज वकिल्या भोसले, उमऱ्या धनशा भोसले, रसाळ्या डिंग्या भोसले, संतोष उर्फ हरी डिस्चार्ज काळे, सुरेश उर्फ तरशा चिंतामण काळे, हणमंता नकाशा भोसले, चिकु उर्फ चिक्या सरमाळ्या भोसले आणि सुभाष काशीनाथ देसाई भोसले या १३ आरोपींना मोक्का कायद्याच्या कलम ३ (१)(२) खाली प्रत्येकी १२ वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी पाच लाख रुपये दंड ठोठावला. तसेच कलम ३(४) खाली सुद्धा प्रत्येकी १० वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी पाच लाख रुपये दंड ठोठावला. न्यायालयाने या गुन्ह्यातील सर्व आरोपींना २० डिसेंबर रोजी दोषी जाहीर करताच जामीनावर सुटलेला यातील १४ वा आरोपी करंड्या उर्फ गुंड्या डिस्चार्ज काळे न्यायालयातून फरार झाला. त्याच्याविरुद्ध न्यायालयाने वॉरंट जारी केले आहे. वरील आरोपींसह इतर आरोपींनी १७ जानेवारी २००१ रोजी कोठेवाडी येथील सर्व घरांना बाहेरुन कड्या लावून सोने व चांदीचे दागीने व रोख असा एकुण ४४ हजार ३५ रुपयांचा ऐवज लुटला होता. तसेच चार महिलांवर सामूहिक अत्याचार केला होता.