शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

आरटीओमधील १,२८५ पदे रिक्त

By admin | Updated: July 30, 2015 02:53 IST

वर्षाला साडेपाच हजार कोटींपेक्षाही अधिक महसूल देणारे राज्यातील परिवहन आयुक्त मुख्यालय आणि त्या अंतर्गत येणाऱ्या आरटीओत अवघे २ हजार ८१५ अधिकारी तसेच कर्मचारी कार्यरत

- सुशांत मोरे, मुंबई वर्षाला साडेपाच हजार कोटींपेक्षाही अधिक महसूल देणारे राज्यातील परिवहन आयुक्त मुख्यालय आणि त्या अंतर्गत येणाऱ्या आरटीओत अवघे २ हजार ८१५ अधिकारी तसेच कर्मचारी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे तब्बल १,२८५ पदे रिक्त आहेत. असे असूनही शासनातर्फे याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.राज्यात आरटीओचा (प्रादेशिक परिवहन अधिकारी) मोठा पसारा आहे. जवळपास ५0 आरटीओ कार्यालये आणि त्यांची उप कार्यालये आहेत. यात वाहनांची नोंदणी करणे, परवान्यांचे नूतनीकरण करणे यासह अनेक कामे आरटीओतील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना करावी लागतात. त्याचबरोबर त्यांच्यावर विशेष मोहिमांचीही जबाबदारी दिली जाते. आरटीओतील अधिकारी आणि कर्मचारी ही जबाबदारी पार पाडत असतानाच परिवहन आयुक्त मुख्यालयातही अवघ्या काही कर्मचाऱ्यांमध्येच कामाचा गाडा हाकत आहेत. याबाबत परिवहन विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले की, राज्यात २00४ साली ४ हजार १00 पदे मंजूर करण्यात आली होती. १० वर्षांपूर्वी एवढी पदे मंजूर करूनही फक्त २ हजार ८१५ जण कार्यरत असल्याने काम करणे कठीण होऊन बसले आहे. जवळपास १ हजार २८५ पदे ही रिक्त असून, ती भरण्यासाठी शासनाकडून कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. मोटार वाहन निरीक्षकाची १0९, तर साहाय्यक मोटार वाहन निरीक्षकाची ३0६ पदे रिक्त आहेत. लिपिक-टंकलेखकाची २७४, साहाय्यक रोखपालची ६९, कर अन्वेषकची ६0, वाहनचालकाची १७, परिवहन हवालदार ५९, शिपाइ ४९ पदे रिक्त असल्याचे सांगण्यात आले. कसा दिलासा द्यायचा हा प्रश्नचरिक्त असलेल्या आणखी काही महत्त्वाच्या पदांमध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी एक, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ६, मोटार वाहन अभियोक्ता ९, साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी ११ पदे रिक्त असल्याचे सांगण्यात आले. शासनाकडून नुकतीच नवीन भरती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे परिवहन आयुक्त कार्यालयाकडून रिक्त पदांची भरती करण्यासाठीचा नवीन प्रस्ताव शासनाकडे एक महिन्यापूर्वीच पाठवण्यात आला आहे. अ,ब,क, ड श्रेणींतील पदांची आकडेवारीश्रेणीमंजूर पदेभरलेली रिक्तअ७६१६२२१३९ब४६२२२४क२,८६६१,९३0९३६ड४२७२४११८६