शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

राज्याला सिंचनासाठी १२,७७३ कोटींचे कर्ज

By admin | Updated: September 7, 2016 06:10 IST

महाराष्ट्रातील २६ महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार नाबार्डमार्फत १२ हजार ७७३ कोटी रुपयांचे कर्ज देणार आहे

मुंबई : महाराष्ट्रातील २६ महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार नाबार्डमार्फत १२ हजार ७७३ कोटी रुपयांचे कर्ज देणार आहे. यासंदर्भात आज नवी दिल्लीमध्ये एक सामंजस्य करार करण्यात आला. केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, छत्तीसगडचे जलसंपदा ब्रजमोहन अग्रवाल आणि तेलंगणाचे जलसंपदा मंत्री टी. हरीश राव यांच्या प्रमुख उपस्थितीत नाबार्डचे अध्यक्ष आणि केंद्रीय जलसंपदा सचिवांनी करारावर स्वाक्षरी केली. महाराष्ट्रातील २६ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकूण ३६ हजार २९९ कोटी रुपये खर्च येणार आहेत. त्यातील २३ हजार ५२६ कोटी रुपयांची उभारणी ही केंद्र आणि राज्य सरकार मिळून ६०:४० या प्रमाणात करण्यात येणार आहे. उर्वरित १२ हजार ७७३ कोटी रुपये केंद्र सरकारने उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उमा भारती यांच्याकडे केली होती. ही रक्कम नाबार्डच्या मार्फत ५ ते ६ टक्के व्याजदरावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्राने घेतला. महाराष्ट्राने दिलेला हा फॉर्म्युला आता देशातील अन्य सिंचन प्रकल्पांसाठीदेखील केंद्राने स्वीकारला आहे. त्यानुसार देशातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकूण ७७ हजार ५९५ कोटी रुपये विविध राज्यांना उपलब्ध होणार आहेत. हे २६ प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील एकूण ८ लाख ५० हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पांना मिळणार निधीवाघूर (जि. जळगाव), बावनथडी (भंडारा), निम्न दुधना (जालना), तिलारी (सिंधुदुर्ग),निम्न वर्धा (वर्धा), निम्न पांझरा (धुळे), नांदुर मध्यमेश्वर टप्पा २ (अहमदनगर), गोसीखुर्द (भंडारा), ऊर्ध्व पैनगंगा (यवतमाळ), बेंबळा (यवतमाळ), तारळी (सातारा), धोमबलकवडी (सातारा), अर्जुना (सिंधुदुर्ग), ऊर्ध्व कुंडलिका (बीड) अरुणा (सिंधुदुर्ग), कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजना (सातारा-सांगली), गडनदी (रायगड), डोंगरगाव (नाशिक), सांगोला शाखा कालवा (सोलापूर), खडकपूर्णा (हिंगोली), वारणा (कोल्हापूर), मोरणा-गुऱ्हेघर (रत्नागिरी), निम्न पेढी (अमरावती), वांग (सातारा), नरडवे (महमद वाडी), कुडाळी (सिंधुदुर्ग)