शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १२७ शाळांत शिक्षणाच्या अधिकाराला पोषक वातावरण नाही

By admin | Updated: January 7, 2017 05:09 IST

शिक्षण अधिकार कायद्याची राज्यात चोखपणे अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेश जारी करण्यात आले.

मुंबई : लहान मुलांचा शिक्षण हा अधिकार आहे. हा अधिकार त्यांना मिळण्यासाठी शिक्षण अधिकार कायद्याची राज्यात चोखपणे अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेश जारी करण्यात आले. पण, शाळेत पायाभूत सुविधा नाहीत, शिक्षक नाहीत त्यामुळे राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागत असल्याचे बाल हक्क अभियानातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. राज्यातील सहा जिल्ह्यांतील १२७ शाळांचे बाल हक्क अभियानाने क्रायबरोबर सर्वेक्षण केले. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. १२७ शाळांपैकी ६४ म्हणजे ५० टक्के शाळांत पहिली ते चौथीसाठी फक्त दोन वर्ग खोल्या उपलब्ध असल्याचे समोर आले आहे. तर, फक्त १८ शाळांत ५ खोल्या आढळून आल्या. ९४ टक्के शाळांमध्ये ग्रंथालय नाही. सहा जिल्ह्यांतील १५० शिक्षकांच्या जागा मंजूर आहेत. पण, त्यापैकी फक्त १०१ शिक्षकांची पदे भरण्यात आली आहेत. ३२.६७ टक्के शिक्षकांच्या जागा अजूनही रिक्त आहेत. शाळांत पायाभूत सुविधाही उपलब्ध नसल्याचे या सर्वेक्षणातून उघड झाले आहे. २८ टक्के शाळांत पिण्याच्या पाण्यासाठी नळाची सोय नाही. ४३ टक्के शाळांत पिण्याच्या पाण्यासाठी हातपंपाचा उपयोग केला जातो. तर, ९ टक्के शाळांत विहीर आणि कूपनलिका आहेत. १३ टक्के शाळांत पिण्याच्या पाण्यासाठी अन्य स्रोतांचा वापर केला जातो. २९ टक्के शाळांना कोणत्याही प्रकारचे कुंपण नसल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले. ९० टक्के शाळांमध्ये शौचालयासाठी पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. शाळांच्या अशा परिस्थितीमुळे शिक्षणाचा अधिकार मुलांना कसा मिळणार, असा प्रश्न अभियानातर्फे उपस्थित करण्यात आला आहे. सर्व मुलांना शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून सरकारने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी असल्याचे अभियानाचे राज्य निमंत्रक सुधाकर क्षीरसागर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)