शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

१२७ चालक आणि ६२ सहप्रवाशांचा मृत्यू

By admin | Updated: February 9, 2016 01:29 IST

दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्तीचा निर्णय घेण्याबरोबरच परिवहन विभागातर्फे सहप्रवाशालाही हेल्मेटसक्ती केली आहे. याविरोधात काही ठिकाणी विरोध केला जात असला तरी दुचाकीवरून

मुंबई : दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्तीचा निर्णय घेण्याबरोबरच परिवहन विभागातर्फे सहप्रवाशालाही हेल्मेटसक्ती केली आहे. याविरोधात काही ठिकाणी विरोध केला जात असला तरी दुचाकीवरून प्रवास करताना सहप्रवाशाचाही जीव धोक्यात येत असल्याचे समोर आले आहे. मुंबईत २0१५मध्ये १२७ चालक आणि ६२ सहप्रवाशांनाही जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे हेल्मेटला विरोध करणे किती जिवावर बेतू शकते हे यावरून स्पष्ट होते. न्यायालयाच्या आदेशानुसार वाहनचालक आणि त्याच्या मागे बसून प्रवास करणाऱ्या व्यक्तीनेही हेल्मेट वापरणे अनिवार्य असल्याचे परिवहन विभागाकडून नुकतेच सांगण्यात आले. त्यामुळे हेल्मेटला आधीपासून विरोध करणाऱ्यांकडून त्यामध्ये आणखी भर पडली. दुचाकीचालकांप्रमाणेच सहप्रवासीही गंभीर जखमी झाल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. या अपघातांमध्ये जवळपास २४१ सहप्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. कुलाबा, पायधुनी, वडाळा, नागपाडा, भायखळा, वरळी, चेंबूर, घाटकोपर, मुलुंड, साकीनाका, वांद्रे, विमानतळ, मालाड, कांदिवली, बोरीवली विभागांतर्गत अपघातांची सर्वांत जास्त नोंद वाहतूक पोलिसांकडे झाली आहे. एकूणच होणाऱ्या अपघातांत चालकाचे आणि सहप्रवाशाचे जाणारे मृत्यू पाहता हेल्मेटसक्ती करण्यासाठी परिवहन विभागाकडून कठोर पाऊल उचलण्यात येत आहे. दुचाकी वाहन उत्पादकांमार्फत त्यांच्या राज्यातील सर्व वाहन विक्रेत्यांनी दुचाकी वाहन विकताना खरेदीदारास दोन हेल्मेट पुरविण्याविषयी निर्देश दोन दिवसांपूर्वी परिवहन विभागाकडून दिले आहेत. तसेच वाहन नोंदणी करताना सादर केलेल्या कागदपत्रांत वाहनासोबत दोन हेल्मेट पुरविण्यात आल्याचे नमूद असल्याची खातरजमाही करण्यास आरटीओंना सांगितले आहे. दुचाकीस्वार आणि त्याच्या सहप्रवाशाने हेल्मेट वापरणे हे योग्यच आहे आणि त्याची आम्ही कठोर अंमलबजावणीही करीत आहोत. त्यासाठी हेल्मेटचे उत्पादक आणि हेल्टेम विकणाऱ्या व्यापाऱ्यांनाही तसे निर्देश दिले आहेत. सर्व आरटीओंना दुचाकीची नोंद करताना हेल्मेटही विकत घेतल्याची माहिती कागदपत्रांत नमूद आहे का हे तपासण्यास सांगितले आहे. - सतीश सहस्रबुद्धे, अतिरिक्त परिवहन आयुक्त, राज्य