शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात मुंबईतील 125 नाले तुंबणार, पालिकेने केली यादी जाहीर

By admin | Updated: June 18, 2016 21:29 IST

स्थानिक रहिवाशी कचरा फेकत असल्याने या ठिकाणी पाणी तुंबणारच, अशी घोषणा करुन पालिकेने पावसाआधीच हात वर केले आहेत

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 18 -  यंदा मुंबईची तुंबापुरी होण्याची भीती सर्वच राजकीय पक्षांनी व्यक्त केल्याने पालिका प्रशासनाने  बचावाचा पावित्र घेतला आहे. त्यानुसार तुंबण्याची शक्यता असलेल्या 125 नाल्यांची यादी पालिकेने आज जाहीर केली आहे. स्थानिक रहिवाशी कचरा फेकत असल्याने या ठिकाणी पाणी तुंबणारच, अशी घोषणा करुन पालिकेने पावसाआधीच हात वर केले आहेत.
 
मुंबईत अद्याप मान्सूनचे आगमन झालेले नाही़ मात्र काही दिवसांपूर्वी मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीत काही तुरळक ठिकाणी पाणी साचले होते. ठेकेदार मिळत नसल्याने नाल्यांची सफाई यंदा उशीरा सुरु झाली़ तर ब-याच ठिकाणी ठेकेदार फिरकलेही नाहीत. त्यामुळे मुंबईत पाणी तुंबणार, अशी भीती विरोधी पक्षांसह सत्ताधा-यांनीही नालेसफाईच्या पाहणीनंतर व्यक्त केली होती़.
 
मात्र तुंबणा-या नाल्यांसाठी पालिकेने स्थानिक रहिवाशांना दोष देण्यास सुरुवात केली आहे. नाल्यांच्या परिसरातील रहिवाशी वारंवार कचरा टाकत असल्याने नाले तुंबतात, असा युक्तिवाद करीत दंडाची तयारीही पालिकेने केली होती़. मात्र ही कारवाई व्यवहार्य नसल्याने पालिकेने 125 नाल्यांची यादी आज जाहीर करुन स्थानिक रहिवाशांनाच जबाबदार धरले आहे. 
 
नाल्यांवर झळकतायेत फलक
आपला दावा खरा करुन दाखविण्यासाठी पालिकेने नाल्यांवर फलक लावले आहेत. यामध्ये नाल्यांमधील गाळ काढण्यापूर्वीचे गाळ काढताना व काढल्यानंतर असे तीन छायाचित्र टाकण्यात आले आहेत. 
 
तुंबणारे सर्वाधिक नाले देवनार, मानखुर्दचे
स्थानिक रहिवाशी कचरा टाकत असलेल्या नाल्यांची यादी पालिकेने जाहीर केली आहे. यामध्ये  देवनार, मानखुर्द, रफी नगर, चेंबूर, गोवंडी येथील सर्वाधिक 17 नाल्यांचा समावेश आहे. त्या पाठोपाठ प्रतीक्षा नगर, सायन, वडाळा, कुर्ला, घाटकोपर, विद्याविहार,भांडुप, अंधेरी, विलेपार्ले येथील नाल्यांचा समावेश आह़े
 
* मुंबईत मोठे व छोटे नाले तसेच नदींची एकूण लांबी 650 कि़मी़ आह़े यापैकी शहरात 109 कि़मी़, पूर्व उपनगरांमध्ये 230 कि़मी़ आणि पश्चिम उपनगरांमध्ये 311 कि़मी़ लांबीचे नाले आहेत