शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

एसटीला प्रतीक्षा १२५ कोटींची

By admin | Updated: March 10, 2016 03:35 IST

एसटी महामंडळाला आर्थिक चणचण भासत असूनही, यामध्ये राज्य शासनाकडून मात्र कोणताही तोडगा काढण्यात रुची दाखवण्यात येत नसल्याचे दिसून आले आहे.

सुशांत मोरे, मुंबईएसटी महामंडळाला आर्थिक चणचण भासत असूनही, यामध्ये राज्य शासनाकडून मात्र कोणताही तोडगा काढण्यात रुची दाखवण्यात येत नसल्याचे दिसून आले आहे. मागील अर्थसंकल्पात एसटी महामंडळासाठी १२५ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, या घोषणेची अजूनही अंमलबजावणी झाली नसून, अद्यापही शासकीय प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसटीतील सूत्रांकडून देण्यात आली.सध्या एसटीचा तोटा हा १,८00 कोटींचा आहे. तो आणखी वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. एसटीला होत असलेला तोटा, उत्पन्नात होत नसलेली वाढ आणि सरकारकडून येत नसलेली देणी, त्यामुळे एसटीला दैनंदिन खर्च भागवणेही कठीण झाले आहे. सरकारच्या तर नुसत्याच घोषणांवर एसटीला अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे महामंडळाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. राज्याच्या गेल्या अर्थसंकल्पात एसटी महामंडळासाठी १२५ कोटी रुपयांचा निधीची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली होती. हा निधी बस स्थानकांचे आधुनिकीकरण आणि नवीन बस घेण्यासाठी वापरात आणला जाणार होता. मात्र, वर्ष उलटले, तरी या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे बऱ्याच बस स्थानकांचे आधुनिकीकरण व नवीकरण थांबल्याची माहिती एसटीतील सूत्रांकडून देण्यात आली. महामंडळातील जवळपास ५६३ बस स्थानकांपैकी १00 बस स्थानकांचे आधुनिकीकरण झालेले आहे. ही कामे निधी मंजूर होण्यापूर्वीच झालेली आहेत. आणखी काही स्थानकांचेही आधुनिकीकरण करण्याची योजना आखण्यात आल्याची माहिती देण्यात आली. प्रत्येक बस स्थानकाचे आधुनिकीकरण करण्यासाठी एसटी महामंडळाला प्रत्येकी पाच ते दहा कोटींचा खर्च येतो. मात्र, उर्वरित बस स्थानकांचे आधुनिकीकरण करायचे झाल्यास, त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्याचे सांगण्यात आले, परंतु हा निधी कधी मिळेल, याबाबत एसटी महामंडळातील एकाही अधिकाऱ्याकडून ठोस माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.एसटी महामंडळाकडून नवीन बसेस विकत घेण्याबरोबरच, काही बसेस या भाड्याने घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, निधीची जुळवाजुळव करताना एसटी महामंडळाच्या चांगलेच नाकी नऊ आले. राज्यात एसटीचे २५0 आगारही आहेत. आगारांचीही सुधारणा केली जात असून, निधीच्या कमतरतेमुळे आगारांचे कामही रखडले आहे. गेल्या अर्थसंकल्पात १२५ कोटी रुपयांची घोषणा केल्यानंतर त्यानंतरच्या अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे त्याची तरतूदही केली होती, परंतु या तरतुदीनंतरही काहीही हालचाली झाल्या नाहीत.