शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

देशातील १२५ कोटी जनतेला जगवणाऱ्यां शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न !

By सुरेश लोखंडे | Updated: December 8, 2017 19:06 IST

सुरेश लोखंडेठाणे : शेतकरी अन्नधान्य पिकवत असल्यामुळे आपणास खायला मिळत आहे. आठ दिवस अन्न न मिळाल्यास कुटूंबे अ‍ॅट्याक येऊन मरतील . देशातील १२५ कोटी जनतेला जगवणाºया शेतकऱ्यांना, शेतमजुरांना न्याय मिळावा यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न सुरू आहेत. ३४ कोटींची कर्जमाफी देण्यात ...

ठळक मुद्देदलितांच्या महामंडळांचे सुमारे ८०० कोटींच्या कर्जमाफी जे बाबासाहेबांचे संविधान बदलतील, त्यांना बदलण्याची ताकद आमच्यातसंविधानामुळे ओबीसीतील तेली समाजाचा मी पहिला पंतप्रधान

सुरेश लोखंडेठाणे : शेतकरी अन्नधान्य पिकवत असल्यामुळे आपणास खायला मिळत आहे. आठ दिवस अन्न न मिळाल्यास कुटूंबे अ‍ॅट्याक येऊन मरतील. देशातील १२५ कोटी जनतेला जगवणाºया शेतकऱ्यांना, शेतमजुरांना न्याय मिळावा यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न सुरू आहेत. ३४ कोटींची कर्जमाफी देण्यात आली असून टप्याटप्याने त्याचा लाभा शेतकºयांना होईल. त्यांच्या मालाला हमीभाव देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी यांनी स्पष्ट केले.ठाणे जि.प. व पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रचार दौऱ्यांसाठी आठवले आले असता ते शहापूर तालुक्यातील वासिंद येथील एका चौक सभेत बोलत होते. शेतकऱ्यांप्रमाणेच दलितांच्या महामंडळांचे सुमारे ८०० कोटींच्या कर्जमाफी करण्यासाठी राज्य शासन विचार करीत असल्याचे त्यांनी यावेळी सुतोवाच केले. शेतीच्या सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी नदी जोड प्रकल्प हाती घेतला आहे. यामुळे ग्रामीण भागाचा विकास होऊन परिणामी देशाचा विकास साधता येणार आहे. यासाठी केंद्र शासनाने नितीन गडकरी यांना नद्या जोडण्याची ... तर मला माणसे जोडण्याची जबाबदारी मिळाल्याचे त्यांनी हास्य विनाद करीत स्पष्ट केले.आमच्या मतांवर आम्ही पडतो... पण ताबडतोब उभे राहतो. पडून राहण्याची सवय आम्हाला नाही... असा विनोद करीत... ते पुढे म्हणाले की दलितांचे मतदान निर्णाय ठरत असल्यामुळे आमच्या पाठिंब्यावर पक्षाचे उमेदवार निवडून येत असल्याचे त्यांनी काही उदाहणे देऊन पटवून दिले. ‘देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहे... तसे उद्धवजीही मित्र ... पण या दोघातील बरे नाही चित्र’ असे यमक साधून या चौक सभेतील उपस्थिताना आठवलेंनी कविताही ऐकवल्या. अपोजिशन वाले मुसलमानो को भडकाते है... हो आपको लढाने का काम करते है... लेकिन हम आपको बढानेका काम करते है... असाही यमक जुळवून त्यांनी मोदी सरकार मुसलमानांच्या हिताचे असल्याचे त्यांनी पटवून दिले. आपण सर्व एकत्र राहून पाक व्यप्त काश्मीर मिळवण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.जीएसटीमुळे थोडा त्रास झाला. पण त्यासाठी चांगल्या दोन सुधारणा झाल्या आहेत. आगामी या बजेटमध्ये त्यांचा समावेश होईल. नोट बंदीचा थोडा त्रास झाला. दलितांचे आरक्षण जाणार असे सांगून विरोधक दलितांमध्ये भीती घालत आहेत. बाबासाहेबांचे संविधान बदलणार असल्यचे सांगितात. पण जे बाबासाहेबांचे संविधान बदलतील, त्यांना बदलण्याची ताकद आमच्यात आहे. बाबासाहेबांच्या आशिर्वादामुळे... संविधानामुळे ओबीसीतील तेली समाजाचा मी पहिला पंतप्रधान झाल्याचे मोदी यांनी सभागृहात सांगून संविधान बदलता येणार नसल्याची ग्वाही दिल्याचे आठवले यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित झालेले आमदार नरेंद्र पवार... यांची ओळख करून घेताना ते म्हणाले ... ‘मला वाटले शरद पवारांचे भाऊ नरेद्र पवार’ असल्याचे हास्य विनोद त्यांनी यावेळी करून उपस्थिताना खेळवत ठेवले.

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूक