शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

१.२५ कोटींची फसवणूक करणारा गजाआड !

By admin | Updated: January 22, 2017 02:52 IST

एलईडी टीव्ही देण्याच्या नावाखाली फसवणूक, आरोपी चित्रांग कंपनीचा व्यवस्थापक !

अकोला, दि. २१- एलईडी टिव्ही लावून देण्याच्या नावावर जिल्हयातील व्यापार्‍यांना १ कोटी ३३ लाख ५५ हजार रू पयांनी फसविणार्‍या खासगी कंपनीच्या प्रक्षेत्र व्यवस्थापकाला शनिवारी अकोला पोलिसांनी गोंदिया येथून अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस पोलीस कोठडी सुनावली.शहरासह जिल्हय़ातील व्यापारी व उद्योजकांना त्यांच्या प्रतिष्ठानांमध्ये एलईडी टीव्ही लावून देऊन त्यावर जाहिरात आल्यानंतर कमिशन देण्याच्या नावाखाली सुमारे १ कोटी २३ लाख ५५ हजार रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा एप्रिल २0१५ मध्ये खदान पोलिसांनी दाखल केला होता. या फसवणूक प्रकरणातील आरोपी चित्रांग टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या एरिया मॅनेजरला खदान पोलिसांनी शनिवारी गोंदिया येथून अटक केली. चित्रांग टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने शहरातील व्यापारी व उद्योजकांना ३५ हजार रुपये जमा ठेव ठेवून त्यांच्या प्रतिष्ठानामध्ये एलईडी टीव्ही लावण्याचे आमिष दाखविले होते. सदर प्रतिष्ठानामध्ये टीव्ही लावल्यानंतर त्यावर २४ तास विविध कंपनी आणि प्रतिष्ठानांच्या जाहिराती येणार असून, त्या माध्यमातून दर महिन्याला कमिशन देण्याचेही आमिष यावेळी कंपनीने व्यापारी व उद्योजकांना दाखविले. या आमिषाला बळी पडत अकोल्यातील तब्बल ३५0 च्यावर व्यापारी, उद्योजकांनी प्रत्येकी ३५ हजार रुपये भरल्यानंतर सुमारे १ कोटी २३ लाख ५५ हजार रुपयांचे एलईडी टीव्ही या कंपनीचा एरिया मॅनेजर शैलेंद्रसिंह चव्हाण याच्याकडून खरेदी केले होते. यामध्ये तक्रारकर्ता देवानंद बागडे यांनीही १ लाख ७५ हजार रुपयांची रोख ठेवी ठेवून अकोला जिल्हय़ाचे वितरक म्हणून काम सुरू केले होते; मात्र यामध्ये त्यांचीही मोठय़ा प्रमाणात फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची तक्रार खदान पोलीस स्टेशनमध्ये केली. पोलिसांनी प्रकरण चौकशीत ठेवल्याने बागडे यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार खदान पोलिसांनी १ एप्रिल २0१५ रोजी चित्रांग टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संचालक माथूर, एरिया मॅनेजर शैलेंद्रसिंह चव्हाण यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला. यावरून खदान पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ४२0, ४0९, ४६८,४७१ नुसार गुन्हे दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला; मात्र एकाचाही पत्ता नसल्याने आरोपींचा शोध लागत नव्हता. शनिवारी खदानचे ठाणेदार गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनातील पथकाने शैलेंद्रसिंह चव्हाण यास गोंदिया येथून अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयने आरोपीस पोलीस कोठडी सुनावली.