शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
4
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
5
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
6
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
7
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
8
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
9
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
10
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
11
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
12
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
13
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
14
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
15
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
16
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
17
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
18
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
19
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट

अकरावीचे १,२२८ विद्यार्थी प्रवेश प्रतीक्षेत

By admin | Updated: July 13, 2016 03:35 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात आली.

मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात आली. या यादीत १४ हजार ७३९ नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले असून, अद्याप १ हजार २२८ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, तिसऱ्या यादीअखेरही कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचा कट आॅफ ९० टक्क्यांपलीकडेच स्थिरावला आहे.दुसऱ्या यादीत ५९ हजार ५०७ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करताना २२ हजार ४६८ नव्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला होता. मात्र उरलेल्या १५ हजार ६५२ विद्यार्थ्यांना तिसऱ्या यादीत प्रवेश मिळण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र तिसऱ्या यादीनंतरही १ हजार २२८ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयाला चौथी यादी लावावी लागणार आहे.तिसऱ्या यादीत २७ हजार १७९ विद्यार्थ्यांना बेटरमेंट मिळालेले आहे; शिवाय आणखी १० हजार ३९१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले आहे. तर ६ हजार २३० विद्यार्थ्यांना दुसऱ्या आणि ४ हजार २३३ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली. बेटरमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांनी पहिल्या किंवा दुसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये प्रवेश घेतलेल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जाऊन आॅनलाइन प्रवेश रद्द करायचा आहे, अशी माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली. ते म्हणाले की, पहिला प्रवेश रद्द केल्यानंतरच पुन्हा प्रवेश मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन तो निश्चित करावा लागेल. त्यासाठी विद्यार्थ्यांना १३ व १४ जुलैचा कालावधी उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्याचे नाव कुठल्याही कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आले नसेल, त्यांनी पुढच्या गुणवत्ता यादीची वाट पाहावी, असे आवाहनही चव्हाण यांनी केले आहे.तिसऱ्या यादीअखेर उरलेल्या १ हजार २२८ विद्यार्थ्यांसाठी १८ जुलैला चौथी यादी जाहीर करण्याचा निर्णय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने घेतला आहे. त्यामुळे तिसऱ्या यादीनंतरही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहण्याचे आवाहन शिक्षण सहायक शिक्षण संचालक राजेंद्र अहिरे यांनी केले.तिसऱ्या गुणवत्ता यादीमधील बोर्डनिहाय व शाखानिहाय प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या -बोर्डकलावाणिज्यविज्ञानएकूणएसएससी९४३२४,५३६१४,५२८४०,००७सीबीएसई६५२४५४१६७२६आयसीएसई११२४१७३१५८४४आयबी००००आयजीसीएसई१२६४५८१३४एनआयओएस०५६२०८७५इतर०२७२५८१३२एकूण१,१३९२५,३९६१५,३८३४१,९१८तिसऱ्या यादीचे कट-आॅफदक्षिण मुंबई -महाविद्यालयाचे नावकलावाणिज्यविज्ञानसेंट झेविअर्स महाविद्यालय९४.००—-८९.२०एच. आर. महाविद्यालय—-९२.४०—-जयहिंद महाविद्यालय८७.४०८७.८३८२.८०के. सी. महाविद्यालय८३.४०८८.४०८५.२०रुईया महाविद्यालय९१.२०—-९२.६०आर. ए. पोद्दार महाविद्यालय—-९०.६०—-रुपारेल महाविद्यालय८३.४०८७.४०९१.००पश्चिम मुंबई -महाविद्यालयाचे नावकलावाणिज्यविज्ञानभवन्स महाविद्यालय३६.८०८४.००८४.६०साठ्ये महाविद्यालय३६.६०८५.४०९०.००एम. एल. डाहाणूकर महाविद्यालय—-८७.६०—-मिठीबाई महाविद्यालय८३.४०८८.००८५.००एन. एम. महाविद्यालय—-९२.२९—-उत्तर मुंबई -महाविद्यालयाचे नावकलावाणिज्यविज्ञानके.जे. सोमय्या महाविद्यालय—-८५.००८९.२०वझे केळकर महाविद्यालय८३.००८९.००९२.४०एम. सी. सी. महाविद्यालय—-९०.२०—-ठाणे जिल्हा -महाविद्यालयाचे नावकलावाणिज्यविज्ञानबेडेकर महाविद्यालय६२.००८५.८०—-बांदोडकर महाविद्यालय—-—-९२.००बिर्ला महाविद्यालय४०.४०८१.६०९०.६०सी. एच. एम महाविद्यालय—-७९.००९०.००