शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

‘दोन वर्षांत १२ हजार कंपन्यांना टाळे’

By admin | Updated: March 22, 2016 04:20 IST

राज्यात गेल्या दोन वर्षांत तब्बल १२ हजार ४३३ औद्योगिक कंपन्यांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला असल्याची कबुली ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली

मुंबई : राज्यात गेल्या दोन वर्षांत तब्बल १२ हजार ४३३ औद्योगिक कंपन्यांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला असल्याची कबुली ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मात्र, याच कालावधीत तब्बल ३० हजार ३५२ नवीन औद्योगिक कंपन्यांना वीजपुरवठा सुरू करण्यात आला असल्याने, महागड्या वीजदरामुळे उद्योग बंद झाल्याचा आरोप बावनकुळे यांनी फेटाळून लावला. राज्यातील महागड्या वीजदरामुळे उद्योग परराज्यात जात असल्याबाबतचा तारांकित प्रश्न अनिल भोसले, किरण पावसकर, संदीप बाजोरिया आदींनी विचारला होता. २०१३-१४ मध्ये औद्यागिक ग्राहकांच्या वीज वापरात मोठ्या प्रमाणावर घट झाली असली, तरी २०१४-१५ मध्ये औद्यागिक वीज वापरामध्ये ५.४८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महावितरण कंपनीचा औद्यागिक ग्राहकांसाठीचा वीजदर सर्वात कमी असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. औद्योगिक ग्राहकांसाठी टाटा पॉवर ८.४० रुपये प्रति युनिट, तर रिलायन्स कंपनी ७.२७ रुपये प्रति युनिट इतका दर आकारते. या तुलनेत महावितरणचा दर ७.२१ रुपये असल्याचे त्यांनी म्हटले आहे.कल्याण येथील ब्रिटिशकालीन नेवाळी विमानतळाची जागा वापराविना पडून असली, तरी नियमानुसार सदर जमीन शेतकऱ्यांना अथवा मूळ भूधारकांना परत करता येणार नाही, असे स्पष्टीकरण महसूलमंत्री खडसे यांनी दिले आहे. काँग्रेस सदस्य संजय दत्त यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न विचारला होता. ब्रिटिशकालीन नेवाळी विमानतळाची जागा वापराविना पडून असल्याने, सदर जागा मूळ भूधारक शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली असून, त्याबाबत राज्य सरकारने काय निर्णय घेतला, अशी विचारणा करण्यात आली होती. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकरणाबाबतचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागविण्यात आल्याची माहिती मंत्र्यांनी दिली आहे. सार्वजनिक कामांसाठी संपादित केलेली जमीन, वापरून झाल्यानंतर अतिरिक्त झाल्यास तिचा वापर सार्वजनिक कामासाठीच करावा लागतो. तसे शक्य नसल्यास अतिरिक्त जमिनीचा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत लिलाव करण्यात येतो. त्यात मूळ भूधारकालाही सहभागी होता येते. संपादित जमीन अतिरिक्त ठरल्यास करावयाच्या कारवाईसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अनुसरूनच राज्य सरकारने धोरण निश्चित केले असल्याचे खडसे यांनी नमूद केले.