शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पालिका बांधणार १२ नव्या शाळा, नियोजन आराखड्यातील तरतुदी रखडत असल्याने निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 02:30 IST

विकास नियोजन आराखड्यातील तरतुदी कागदावरच राहात असल्याने, महापालिकेने या वर्षीपासून मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच, काही नागरी सुविधांवर काम सुरू केले आहे.

मुंबई : विकास नियोजन आराखड्यातील तरतुदी कागदावरच राहात असल्याने, महापालिकेने या वर्षीपासून मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच, काही नागरी सुविधांवर काम सुरू केले आहे. एकीकडे विद्यार्थ्यांची गळती सुरू असताना, पालिकेने २८ हजार ४५२ चौरस मीटर आकाराच्या १२ नवीन शाळा सुरू करण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. या शाळांच्या बांधकामासाठी २६ कोटी ४२ लाख रुपयांची तरतूद २०१७-१८च्या अर्थसंकल्पात केली आहे.महापालिकेचा प्रस्तावित ‘प्रारूप विकास आराखडा २०३४’ हा अद्याप मंजूर झालेला नाही. तरी या आराखड्यातील तांत्रिकदृष्ट्या मंजूर असलेल्या नागरी सेवा-सुविधा निर्माण करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. विकास आराखडा २०३४ साठी पालिकेने अंमलबजावणी आराखडा तयार केला आहे. हा २० वर्षांचा आराखडा चार पंचवार्षिक टप्प्यांमध्ये विभागण्यात आला आहे. तसेच प्रत्येक पंचवार्षिक टप्पादेखील पुन्हा वार्षिक टप्प्यामध्ये विभागला आहे. याप्रमाणे, विकास नियोजन आराखड्यानुसार प्रत्येक वर्षी नवीन कामांसाठी अर्थसंकल्पात आवश्यक ती तरतूद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.१९९१ च्या मंजूर सुधारित विकास आराखड्यातील शिक्षणाशी संबंधित आरक्षणे, जशीच्या तशी २०३४ च्या प्रारूप विकास आराखड्यात दर्शविण्यात आली आहेत. या आरक्षित जागा महापालिकेच्या ताब्यात असून, मोकळ्याही आहेत, तसेच या आरक्षणाबाबत नियोजन समितीने कोणतेही बदल प्रस्तावित केलेले नाहीत.त्यामुळे पालिका शाळांसाठी आरक्षित असलेले १० भूखंड, तर पालिकेच्या ताब्यात असलेले इतर दोन भूखंड अशा एकूण १२ भूखंडांवर शाळा बांधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती विकास नियोजन खात्याचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनीदिली.शाळांची सद्य:स्थितीसध्या महापालिकेच्या एक हजार ४८ प्राथमिक शाळा असून, त्यात दोन लाख ८७ हजार ९७९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर महापालिकेच्या १४७ माध्यमिक शाळांमध्ये ३५ हजार ९२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.तर ४२२ अनुदानित शाळांमधून एक लाख ३८ हजार ४४२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यानुसार, एकूण एक हजार ६१७ शाळांमधून चार लाख ६२ हजार ३४१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ६९३ खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये तीन लाख २५ हजार ४२१ विद्यार्थी आहेत.