शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्यांत १२ डॉक्टरांवर हल्ले

By admin | Updated: August 1, 2016 04:47 IST

सरकारी आणि महापालिका रुग्णालयांत रुग्णांची सेवा करण्यासाठी निवासी डॉक्टर २४ तास आॅन ड्युटी असतात.

मुंबई : सरकारी आणि महापालिका रुग्णालयांत रुग्णांची सेवा करण्यासाठी निवासी डॉक्टर २४ तास आॅन ड्युटी असतात. पण, या रुग्णालयांत रुग्णाचा मृत्यू झाल्यास काही रुग्णांचे नातेवाईक निवासी डॉक्टरांना मारहाण करतात. जानेवारी ते जुलै २०१६ यादरम्यान १२ निवासी डॉक्टरांना मारहाण झाली. निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सरकारने आश्वासने दिली. मात्र, ते अजूनही असुरक्षित असल्याचे ३० जुलैला रात्री पुण्यातील ‘बीजेएमसी’ रुग्णालयात घडलेल्या घटनेनंतर स्पष्ट झाले. निवासी डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीचे प्रकार रोखण्यासाठी रुग्णाबरोबर दोनच नातेवाईक असावेत, अशी मागणी करण्यात आली होती. कारण, समूहाची मानसिकता वेगळी असते. एकाचवेळी अनेक जण आल्यास त्यांना विरोध करणे शक्य होत नाही. त्यामुळे रुग्णाबरोबर एक नातेवाईक असा नियम लागू करण्यात आला होता. पण, त्याचे पालन केले जात नाही. राज्यातील सर्व शासकीय आणि महापालिका रुग्णालयांमध्ये मिळून ८९६ सुरक्षारक्षक तैनात करण्यात येतील, असे आश्वासन सरकारने सप्टेंबर २०१५मध्ये दिले होते. हीच माहिती लिखित स्वरूपात उच्च न्यायालयात सादर केली होती. काही ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. पण, ते सुरक्षारक्षक गांभीर नाहीत, असे मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले. या आठवड्यातच नांदेड आणि काल पुणे येथे मारहाणीचे प्रकार घडले. सरकार निवासी डॉक्टरांच्या बाबतीत गांभीर्याने विचार करत आहे का, असाच प्रश्न उपस्थित होत असल्याचे मार्ड पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. डॉक्टर संरक्षण कायद्यातील तरतुदीत बदल करण्यात यावा, अशी मागणीही मार्डने केली आहे. या कायद्यांतर्गत आरोपीला एका दिवसात जामिनावर सोडले जाते. आरोपींना आठ दिवसांसाठी अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी मार्ड लढा देत आहे. तरीही हा प्रश्न सुटला नसल्याने मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी खंत व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)