शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

१२ अल्पवयीन गुन्हेगारांचे पलायन

By admin | Updated: January 12, 2016 02:20 IST

बारा अल्पवयीन गुन्हेगारांनी बराकीचे गज कापून शहरातील बालसुधारगृहातून पलायन केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. मानवी मनोरे रचून आणि चादरीने दोर बनवून या गुन्हेगारांनी

नाशिक : बारा अल्पवयीन गुन्हेगारांनी बराकीचे गज कापून शहरातील बालसुधारगृहातून पलायन केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. मानवी मनोरे रचून आणि चादरीने दोर बनवून या गुन्हेगारांनी सुधारगृहाची २० फूट उंचीची दगडी भिंत ओलांडल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी कारागृह महानिरीक्षकांनी हवालदार आणि शिपायाला तत्काळ निलंबित केले आहे.दरम्यान, पलायन केलेल्या बालगुन्हेगारांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली आहेत. यापैकी दोघांना पुण्यातील निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़बालन्यायालयाने शिक्षा सुनावलेले गंभीर गुन्ह्यातील राज्यभरातील २६ अल्पवयीन गुन्हेगार मेळा बसस्थानकासमोरील बालसुधारगृहात आहेत़ सोमवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास यातील १२ गुन्हेगारांनी पलायन केले. यामध्ये पुणे येथील ९, सातारा येथील २, तर मुंबईतील एका अल्पवयीन गुन्हेगाराचा समावेश आहे़ हे गुन्हेगार १७ ते १९ वर्षे वयोगटातील असून, त्यामध्ये खुनाच्या गुन्ह्यातील ३, जबरी चोरीतील ३, जबरी लुटीतील १, तर चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा झालेले ५ गुन्हेगार आहेत़सोमवारी दुपारी पुणे येथील अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक डॉ़ भूषणकुमार उपाध्याय यांनी बालसुधारगृहास भेट देऊन घटनेची चौकशी केली़ तसेच रात्रपाळीतील कर्मचारी हवालदार राजेंद्र झाल्टे व शिपाई भास्कर भगत यांच्या निलंबनाचे आदेश दिले़