शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

१२ लाखांचा बक्षिसी नक्षलवादी शरण

By admin | Updated: November 12, 2014 00:58 IST

उत्तर गडचिरोली भागात मागील १२ वर्षांपासून कार्यरत जहाल नक्षलवादी माजी दलम कमांडर गोपी ऊर्फ निरींगसाय दरबारी मडावी याने सोमवारी गडचिरोली पोलिसांसमोर शरणागती पत्करली.

१२ वर्षांपासून कार्यरत : उत्तर गडचिरोली भागात माओवादी चळवळीला हादरागडचिरोली : उत्तर गडचिरोली भागात मागील १२ वर्षांपासून कार्यरत जहाल नक्षलवादी माजी दलम कमांडर गोपी ऊर्फ निरींगसाय दरबारी मडावी याने सोमवारी गडचिरोली पोलिसांसमोर शरणागती पत्करली. गोपीच्या शरणागतीमुळे उत्तर गडचिरोली भागातील नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. नक्षलवाद्याच्या उत्तर गडचिरोली, बालाघाट, राजनांदगाव विभागाचा प्रवक्ता म्हणून गोपी याने काही काळ काम केले होते. मूळचा कोरची गावचा रहिवासी असलेल्या गोपीचे कोरची येथे बसस्थानकालगत घरही आहे. २००२ पासून तो नक्षल चळवळीत दाखल झाला होता. मागील १५ वर्षांच्या काळात त्याने या भागात मोठ्या प्रमाणावर हिंसाचाराच्या घटना घडविल्या होत्या. त्याच्यावर १२ लाखाचे बक्षीसही पोलिसांनी ठेवले होते. कोरची दलम के -३ चा तो माजी कमांडर होता. सोमवारी दुपारी कुरखेडा तालुक्यातील सावरगाव जवळ जंगलात एका मध्यस्थामार्फत त्याने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्यानंतर त्याला सायंकाळी गडचिरोली पोलीस मुख्यालयात आणण्यात आले. २०१३ मध्ये एकूण ४८ नक्षलवाद्यांनी आत्मसर्पण केले. त्यामध्ये ३ डीव्हीसी सदस्य, १ कमांडर, ३ उपकमांडर, ३९ दलम सदस्य यांचा समावेश आहे. तर २०१४ मध्ये आतापर्यंत २५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून यामध्ये एक डीव्हीसी सदस्य, २ कमांडर, ३ उपकमांडर आणि १२ दलम सदस्यांचा समावेश आहे. (जिल्हा प्रतिनिधी)