शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

प्रिसकॉन रिएल्टर्सविरुद्ध 12 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा

By admin | Updated: August 12, 2016 21:54 IST

प्रिसकॉन रिएल्टर्स अ‍ॅन्ड इन्फ्रास्ट्रर प्रायव्हेट लिमिटेड या बांधकाम कंपनीमध्ये एका सदनिकेचे 12 लाख 85 हजार 247 रुपयांमध्ये बुकिंग करूनही त्यांना सदनिका देण्यात आली नाही

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 12 - अकोला येथील रहिवाशाने ठाण्यातील प्रिसकॉन रिएल्टर्स अ‍ॅन्ड इन्फ्रास्ट्रर प्रायव्हेट लिमिटेड या बांधकाम कंपनीमध्ये एका सदनिकेचे 12 लाख 85 हजार 247 रुपयांमध्ये बुकिंग करूनही त्यांना सदनिका देण्यात आली नाही. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात या कंपनीसह तिचे संचालक विनय केडिया यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट अ‍ॅक्ट (मोफा) कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी सुरु असल्यामुळे कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.इंदोर येथे नोकरीला असलेल्या संतोष शर्मा यांनी ठाण्यात गुंतवणूक करण्यासाठी घोडबंदर रोडवरील प्रिसकॉन रिएल्टर्स च्या प्रेस्टिज रेसिडेन्सी, हिल व्यूह, या घोडबंदर रोडवरील इमारतीमध्ये 6 डिसेंबर 2012 रोजी एक सदनिका आरक्षित केली. सदनिका आरक्षित केल्यापासून त्यांना 550 दिवसांमध्ये इमारतीचे काम पूर्ण होईल, असेही प्रिसकॉनतर्फे सांगण्यात आले होते. त्यानुसार या कंपनीने आरक्षित केलेल्या सदनिकेचे कोटेशनही दिले होते. कोटेशननुसार त्या सदनिकेची 12 लाख 85 हजार 247 ही 20 टक्के रक्कमही शर्मा यांनी भरली होती. ही रक्कम घेऊनही या कंपनीने किंवा तिच्या वतीने केडीया यांनी शर्मा यांच्यासोबत कोणताही करार किंवा नोंदणी केली नाही. या इमारतीच्या बांधकाम संदर्भातील वस्तुस्थिती लपवून, जाणूनबुजून चुकीची माहिती देऊन शर्मा यांची दिशाभूल करण्यात आली. तसेच मोफा कायद्याचाही भंग केला. याप्रकरणी शर्मा यांनी नांदेड येथे गुन्हा दाखल केला. परंतु प्रेस्टीज रेसिडेंसी ही इमारत ठाण्याच्या घोडबंदर भागात असल्याने तसेच त्यांची फसवणूकही याच भागात झाली असल्याने हा गुन्हा कासारवडवली पोलीस ठाण्यात 10 ऑगस्ट रोजी वर्ग करण्यात आला. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. डी. टेळे यांनी सांगितले.