शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१२ ‘मपोसे’ अधिकारी बनणार उपमहानिरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 05:28 IST

मूळच्या उपअधीक्षक पदापासून उपायुक्त/अधीक्षक बनलेल्या राज्य पोलीस दलातील १२ अधिकाऱ्यांसाठी खूशखबर आहे. या अधिकाºयांची भारतीय पोलीस सेवा (आयपीएस)मधील सेवाज्येष्ठता एक वर्षाने वाढविली आहे.

जमीर काझीमुंबई : मूळच्या उपअधीक्षक पदापासून उपायुक्त/अधीक्षक बनलेल्या राज्य पोलीस दलातील १२ अधिकाऱ्यांसाठी खूशखबर आहे. या अधिकाºयांची भारतीय पोलीस सेवा (आयपीएस)मधील सेवाज्येष्ठता एक वर्षाने वाढविली आहे. आता त्यांना लवकरच उपमहानिरीक्षक/ अप्पर आयुक्त म्हणून बढती मिळणार आहे. पदोन्नती करण्याबाबतचा प्रस्ताव तयार असून, गृहविभागाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करून केंद्राकडे पाठविला जाईल.कोल्हापूरचे अधीक्षक संजय मोहिते, जळगावचे दत्ता कराळे, मुंबईतील सुप्रिया यादव, नवी मुंबईतील प्रवीण पवार यांचा त्यामध्ये समावेश आहे. अशा १२ अधिकाºयांना सध्या आयपीएसच्या २००५च्या बॅचमध्ये सामील केले होते. तथापि, केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणाच्या (कॅट) आदेशानुसार, त्यांना २००४ या बॅचमध्ये सामील केले जाणार असल्याचे गृहविभागातील अतिवरिष्ठ अधिकाºयांकडून सांगण्यात आले.राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) उपअधीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाल्यानंतर, त्यांना आयपीएस श्रेणी मिळण्यासाठी सुमारे १२-१३ वर्षे सेवा बजावावी लागते. भारतीय सेवेत समाविष्ठ झाल्यानंतर, तेथील ज्येष्ठतेनुसार त्यांना बढती दिले जाते. त्यानुसार, १९९२ला उपअधीक्षक म्हणून भरती झालेल्या या अधिकाºयांना २००५चे आयपीएस केडर देण्यात आले. मात्र, दरम्यानच्या कालावधीमध्ये ‘मपोसे’ कोट्यातून आवश्यक पदोन्नती न दिल्याने, काही अधिकाºयांनी याविरुद्ध ‘कॅग’मध्ये धाव घेतली. त्याला अनुकूलता दाखवित प्राधिकरणाने १९९२च्या एमपीएससी बॅचच्या अधिकाºयांना २००४चे आयपीएस केडर देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. त्यानुसार, सध्या विविध घटकांमध्ये अधीक्षक, उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले हे अधिकारी ज्येष्ठतेनुसार अप्पर आयुक्त/ उपमहानिरीक्षक म्हणून बढतीसाठी पात्र ठरले आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव तयार झाला असून, येत्या काही दिवसांत होणाºया अस्थापना मंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरी दिली जाणार आहे.या अधिकाºयांना बढती...बी. जी. गायकर ,एस. बी. फुलारी, संजय मोहिते, सुनील कोल्हे, दत्ता कराळे, प्रवीण पवार, डॉ. प्रभाकर बुधवंत, सुप्रिया पाटील-यादव, ए.बी. रोकडे, डॉ. बी. जी. शेखर व संजयकुमार बाविस्कर यांची बढती होईल. याच बॅचमधील जयंत नाईकनवरे हे सध्या प्रतिनियुक्तीवर सीबीआयमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांची बढती त्यांच्या कोट्यातून होईल.यांना अजूनही प्रतीक्षा...मूळसे मपोसेच्या १९९२च्या बॅचच्या अधिकाºयांना २००४ची श्रेणी मिळणार असल्याचे, आयपीएसच्या थेट २००५च्या बॅचमधील अधिकाºयांना बढतीसाठी आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. या तुकडीमध्ये ठाणे ग्रामीण व पुणे ग्रामीणचे अधीक्षक अनुक्रमे विरेश प्रभू व सुवेझ हक, मुंबईतील परिमंडळ-१ उपायुक्त मनोजकुमार शर्मा, नाशिकचे ग्रामीणचे संजय दराडे, शारदा राऊत यांचा समावेश आहे.