शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

विदर्भातील आदिवासी भागात १२ कोटींचा घोटाळा

By admin | Updated: May 10, 2017 03:02 IST

नागपूर आयुक्तांच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या चंद्रपूर, अहेरी, भामरागड, नागपूर, चिमूर, गडचिरोली, देवरी या आदिवासी विभागांत

दीप्ती देशमुख । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नागपूर आयुक्तांच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या चंद्रपूर, अहेरी, भामरागड, नागपूर, चिमूर, गडचिरोली, देवरी या आदिवासी विभागांत २००४ ते २००९ या काळात संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या योजनांतर्गत एकूण १२ कोटी २५ लाख १३ हजार ९९५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे गायकवाड आयोगाच्या अहवालातून उघडकीस आले आहे. गायकवाड समितीने संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस अहवालातून केली आहे. २००४ ते २००९ या काळात विजयकुमार गावित आदिवासी विकास विभागाचे मंत्री होते. घोटाळ्याच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एम.जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. उच्च न्यायालयात हा अहवाल सादर झाला आहे. आदिवासींसाठी दुधाळ जनावरे खरेदी करून देणे, कन्यादान योजना, वेगवेगळे प्रशिक्षण देणे, शेतीसाठी पंप आणि पाइप खरेदी करणे आदी योजना सरकार राबवत आहे. त्यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला. समितीने नागपूरच्या अतिरिक्त आदिवासी आयुक्तांच्या अधिकार क्षेत्रात येत असलेल्या सर्व प्रकल्पांची चौकशी केली आहे. त्यात चंद्रपूर, अहेरी, भामरागड, नागपूर, चिमूर, गडचिरोली आणि देवरी इत्यादी प्रकल्पांचा समावेश आहे. वेगवेगळ्या योजनांतर्गत चंद्रपूरच्या प्रकल्प अधिकाऱ्याने ६४ लाख ८४ हजार ५७ रुपये, अहेरी २ लाख ६२ हजार ६९६ रुपये, भामरागड ८५ लाख १५ हजार ११८ रुपये, चिमूर १ कोटी ४४ लाख ८५ हजार ४०८ रुपये, गडचिरोली २ कोटी ३९ लाख १४ हजार ६२० रुपये, देवरी १ कोटी, ११ लाख ५६ हजार ०५५ रुपये तर नागपूरमध्ये ५ कोटी ७६ लाख ९६ हजार ०४१ रुपयांचा घोटाळा झाल्याचे गायकवाड अहवालावरून स्पष्ट होते.नागपूरमध्ये चौकशी सुरू असताना प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला आग लागली. प्रकल्प अधिकाऱ्याने समितीपासून हे लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चौकशी केल्यानंतर कार्यालयाला आग लागल्याचे निदर्शनास आले. संबंधित अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार केल्याचे समितीला सांगितले. परंतु, एफआयआरची प्रत सादर केली नाही. ही आग जाणूनबुजून लावून कागदपत्रे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला की खरोखरच आग लागली, याबाबत पोलिसांनी तपास करावा, अशी शिफारसही समितीने केली आहे. (क्रमश:)