शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

FRP न देणाऱ्या राज्यातील १२ कारखान्यांचे गाळप परवाने रद्द

By admin | Updated: January 11, 2016 18:17 IST

राज्यातील १२ साखर कारखान्यांचे गाळप परवाने रद्द करण्यात आले आहेत. FRP न देणाऱ्या कारखान्यांवर ही कारवाई केली आहे. अशी माहिती साखर आयुक्त विपिन शर्मांनी दिली आहे.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. ११ -  राज्यातील १२ साखर कारखान्यांचे गाळप परवाने रद्द करण्यात आले आहेत. FRP न देणाऱ्या कारखान्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती साखर आयुक्त विपिन शर्मांनी दिली आहे. 

मुख्यमंत्री सहाय्यता निधी न दिल्याने ७ कारखान्यान्यांना नोटिसा धाडण्यात आल्या आहेत तर १३ कारखाने बंद  करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील वर्षी गाळप केलेल्या उसापोटी एफ.आर.पी.चे ३२८ कोटी रुपये थकविणाऱ्या राज्यातील ४४ साखर कारखान्यांवर केवळ कारवाईची भाषा केली जात होती पण आज  साखर आयुक्तांनी ही कारवाई केली आहे. 
 
यामद्ये नाशिक - गिरनार, सोलापूर -  शंकर कुमादास, शंकर रत्न, नागपूर - अगस्ती वृद्धेश्वर प्रसाद शुगर, सांगली - महाकाली, माणगंगा, यशवंत खानापूर, सातारा - प्रतापगड, किसनवीर, पुणे - भीमा पाटस, या कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे.  
साखर आयुक्तांनी मागील आठवड्यात एफ.आर.पी.नुसार पैसे न देणाऱ्या ५१ साखर कारखान्यांना गाळप परवाना रद्द करण्याची नोटीस बजावली होती.
मागील वर्षी (२०१४-१५) गाळप केलेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत न दिल्यास गाळप परवाना रद्द केला जाईल व आतापर्यंत केलेले गाळप विनापरवाना केले म्हणून कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी म्हटले होते. या नोटिसीनंतर जवळपास २१ साखर कारखान्यांनी पावणेदोनशे कोटी रुपये दिले.
 
मागील वर्षाचे पैसे न देणाऱ्या व यावर्षी गाळप हंगाम सुरू असलेल्या जवळपास ३० साखर कारखान्यांकडे २०० कोटींची रक्कम थकीत आहे. याशिवाय मागील वर्षी गाळप हंगाम घेतलेल्या व यावर्षी बंद असलेल्या १४ साखर कारखान्यांकडे १२५ कोटी थकले आहेत