शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
4
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
5
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
6
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
7
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
8
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
9
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
10
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
11
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
12
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
13
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
15
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
16
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
17
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
18
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
19
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
20
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती

अकरावीची प्रवेशप्रक्रिया 22 जूनपासूनच- विनोद तावडे

By admin | Updated: June 20, 2017 16:45 IST

करावीची प्रवेशप्रक्रिया 22 जूनपासून सुरू करणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 20 - अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया 22 जूनपासून सुरू करणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी केली आहे. अकरावीची प्रवेशप्रक्रियेतील तांत्रिक त्रुटी उद्याच्या दिवसात दूर करणार असून, परवापासून ऑनलाइन प्रवेश प्रकिया सुरळीत होईल, असंही विनोद तावडे म्हणाले आहेत. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  

गणितात नापास म्हणजे आयुष्यात नापास असं होत नाही. गणिताला पर्यायी विषयच ठेवणार, असंही विनोद तावडेंनी स्पष्ट केलं आहे. गणिताला पर्यायी विषय ठेवण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याचं आश्वासनंही तावडेंनी दिलं आहे. तत्पूर्वी कला शाखेत प्रवेश घेण्यासाठी किंवा व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी गणिताची अजिबात आवश्यकता नसते. त्यामुळे इयत्ता दहावीत हा विषय ऐच्छिक ठेवण्याचा विचार करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य शिक्षण मंडळाला सोमवारी केली होती.(आर्ट्सला जायचेय, तर गणित कशाला?)

शाळेत शिक्षण घेताना, विशेष मुलांनाही होत असलेला त्रास व राज्य शिक्षण मंडळाने या संदर्भात उचललेली पावले, या दोन मुद्द्यांवर प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ हरिश शेट्टी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्या. व्ही. एम. कानडे व न्या. ए. एम. बदर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्यावेळी गणित आणि भाषांमध्ये उत्तीर्ण होण्याची क्षमता नसल्याने दहावीनंतर शिक्षण अर्धवट सोडण्याचे प्रमाण जास्त आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते. कला किंवा अन्य व्यावसायिक शिक्षणात पदवी घेण्याकरिता गणिताची आवश्यकता नाही. त्यामुळे गणिताच्या अभ्यासाची सक्ती केली नाही, तर विद्यार्थी किमान पदवीधर तरी होतील, असेही न्यायालयाने सुनावणीत म्हटले होते.जुनी पद्धत पुन्हा अंमलात आणागणित किंवा गणिताशिवाय सात विषयांत उत्तीर्ण झाल्यास, पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याची परवानगी यापूर्वी राज्य शिक्षण मंडळ देत होते. त्यांनी (शिक्षण मंडळ) हे बंद करण्याचा निर्णय का घेतला, हे कळत नाही. जुनी पद्धत पुन्हा एकदा अंमलात आणण्याचा विचार करा, असे म्हणत न्यायालयाने तज्ज्ञांकडून याबाबत सल्ला घेण्याची सूचनाही राज्य सरकारला केली.